गेल्या आठवड्यात Prime Day सेल दरम्यान कोणत्याही कारणास्तव तुम्ही स्मार्टफोनवरील सर्वोत्तम डील गमावल्या असतील, तर काळजी करू नका. Amazon ने नवीन सेलची घोषणा केली आहे, जी तुमच्यासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम संधी आहे. सेलदरम्यान, Amazon OnePlus, Xiaomi, Samsung, iQOO, Tecno, OPPO, Realme आणि Vivo यासह इतर ब्रँडच्या प्रोडक्ट्सवर 40 टक्के सूट मिळत आहे.
हे सुद्धा वाचा : 5G Auction : देशातील 13 शहरांमध्ये सूरु होणार 5G सेवा, बघा महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात मिळेल सर्वप्रथम…
याव्यतिरिक्त, नवीनतम Redmi K50i 5G, Samsung M13 सिरीज, Tecno Spark 9, Tecno Camon 19 Neo आणि iQOO Neo 6 हे इतर स्मार्टफोन आहेत, जे सर्वोत्तम सूट आणि ऑफरसह येतील. 25 जुलैपासून मोबाईल सेव्हिंग डेज सुरू झाला आहे आणि 29 जुलै 2022 पर्यंत लाइव्ह राहणार आहे. म्हणजेच आता दोन दिवस तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकता.
क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून खरेदीदारास 750 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल. त्याबरोबरच, सिटी बँक कार्ड वापरून 5,000 रुपये तर बँक ऑफ बडोदा किंवा EMI इत्यादी वापरून रु. 7,000 चा किमान व्यवहार निवडून 1,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळू शकते.
तुम्ही 2,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत देखील मिळवू शकता म्हणजेच 27 जुलै 2022 पर्यंत 7,500 रुपयांच्या किमान व्यवहारावर अंदाजे 10 टक्के कॅशबॅक मिळवू शकता. जे प्रति वापरकर्ता फक्त एकदा वैध असेल. प्राइम मेंबर्स 20,000 रुपयांपर्यंतच्या बचतीचा लाभ घेऊ शकतात. ज्यामध्ये HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 6 महिने मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि 3 महिन्यांचे अतिरिक्त विनाखर्च EMI सारखे फायदे समाविष्ट आहेत. ग्राहक निवडक स्मार्टफोन्सवर कूपन वापरून अतिरिक्त सवलतींचा लाभ घेऊ शकतात.
सेलमध्ये Apple iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max वर सूट दिली जात आहे. आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो की, iPhones वर खरेदीदारांना 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
OnePlus स्मार्टफोन्सबद्दल सांगायचे तर, आम्ही तुम्हाला सांगतो की OnePlus 9 Series 5G वर 15,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच, OnePlus 9 Pro वर अतिरिक्त झटपट बँक सवलत आणि एक्सचेंजवर 5,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत आहे.