जास्त किंमतीमुळे तुम्हाला Amazon Prime चे सदस्यत्व मिळू शकत नसल्याची तक्रार तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये Amazon Prime चा आनंद घेऊ शकता. खरं तर, Amazon बीटा व्हर्जनवर Amazon Prime Lite ची चाचणी करत आहे. ही कमी किमतीची प्राइम सबस्क्रिप्शन सेवा असेल.
Amazon ने डिसेंबर 2021 मध्ये आपल्या प्लॅनमध्ये 50 टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर 999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनची किंमत 1,499 रुपये झाली आहे. कंपनीकडे मासिक प्लॅन देखील आहेत ज्यांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. 129 रुपयांचा प्लॅन आता 179 रुपयांचा झाला आहे, तर 329 रुपयांचा तीन महिन्यांचा प्लॅन आता 459 रुपयांचा झाला आहे.
हे सुद्धा वाचा : WhatsAppवर विशिष्ट संपर्कासाठी वेगळी रिंगटोन सेट करा, फॉलो करा सोप्या स्टेप्स…
Amazon Prime Lite Amazon Prime पेक्षा थोडा वेगळा असेल. त्याची किंमत 999 रुपये असेल आणि तुम्हाला एक वर्षासाठी सदस्यत्व मिळेल. या प्लॅनची बीटा चाचणी पहिल्यांदा OnlyTech.com ने नोंदवली होती. प्राइम मेंबरशिप सध्या बीटा वापरकर्त्यांसाठी 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Amazon प्राइम एक-दिवसीय किंवा ऑर्डर-डे डिलिव्हरी ऑफर करतो, Amazon प्राइम लाइट दोन-दिवसीय वितरण ऑफर करते. Amazon Prime Lite मध्ये देखील Amazon Prime Video पाहण्याची संधी मिळेल. मात्र त्यात जाहिराती दिसतील आणि कॉलिटी HD असेल. Amazon Prime Lite सदस्यत्व दोन उपकरणांवर वापरता येईल. याशिवाय Amazon Prime Lite मध्ये Amazon प्राइम म्युझिकचा अॅक्सेस मिळणार नाही. याशिवाय नो-कॉस्ट EMI, फ्री-ईबुक्स आणि प्राइम गेमिंगची सुविधाही मिळणार नाही.