कंपनीने आपल्या व्हाइट किंडलची किंमत ५,९९९ रुपये ठेवली होती. रंगांना सोडल्यास इतर सर्व वैशिष्ट्ये हया दोन्ही डिवायसेसमध्येसारखी आहेत.
ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनने भारतात आपला व्हाइट किंडल लाँच केला आहे, जसे की ह्या डिवाइसच्या नावानेच स्पष्ट होते की, हा सफेद रंगाचा आहे. आधी कंपनीने आपल्या ह्या डिवाईसला केवळ काळ्या रंगात लाँच केले होते. आता भारतीय बाजारात किंडल काळ्या आणि पांढ-या अशा दोन्ही रंगात मिळेल.
कंपनीने आपल्या व्हाइट किंडलची किंमत ५,९९९ रुपये ठेवली होती. रंगांना सोडल्यास इतर सर्व वैशिष्ट्ये हया दोन्ही डिवायसेसमध्येसारखी आहेत.
अॅमेझॉनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 6 इंचाची ग्रे स्केल डिस्प्ले दिली आहे. ह्याच्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 800×600पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा डिवाइस 4GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. कंपनीनुसार डिवाइसची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ४ आठवडे बॅकअप देण्यास सक्षम आहे.
त्याशिवाय सर्व अॅमेझॉन कंटेंटसाठी मोफत क्लाउड स्टोरेजसुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर वायफाय कनेक्टिव्हिटीची सुविधाही आहे.
अॅमेझॉनने किंडलला फक्त पांढ-या रंगात सादर केले आहे. तर दुसरीकडे पेपरव्हाइट आणि वोयाज अजूनसुद्धा काळ्या रंगात उपलब्ध आहे. किंडल पेपरव्हाइटची किंमत 10,999 रुपये आणि किंडल वोयाजची किंमत 16,999 रुपये आहे.