Amazon च्या Great Summer Sale ची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
सेल सर्व सदस्यांसाठी 2 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.
ICICI बँक, बँक ऑफ बडोदा आणि वन कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास मोठ्या सवलती उपलब्ध
ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘Amazon Great Summer Sale’ ची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. ही ऑनलाइन सेल 2 मे पासून विविध प्रोडक्ट्स कॅटेगरीजमध्ये शेकडो डीलसह सादर होणार आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, सेलदरम्यान उपलब्ध असलेले ऑफर्स काही काळापूर्वीच Amazon Prime मेम्बर्ससाठी लाईव होतात. त्याचप्रमाणे, Amazon Great Summer Sale चे डील्स देखील प्राईम मेम्बर्ससाठी आधीच लाईव्ह केले जातील.
Amazon Great Summer Sale साठी एक मायक्रोसाइट ई-कॉमर्स कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर लाइव्ह झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा सेल सर्व सदस्यांसाठी 2 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. तर, प्राईम मेम्बर्ससाठी हा सेल 2 मे ला मध्यरात्री 12 वाजतापासून लाईव्ह असणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलदरम्यान मोबाइल फोन, ॲक्सेसरीज, कॉस्मेटिक्स आणि फॅशन आयटम, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टवॉच, इअरबड्स आणि स्मार्ट टीव्ही यासारख्या प्रोडक्ट्सवर सवलतीच्या ऑफर मिळतील. याशिवाय, ई-कॉमर्स कंपनीने ग्राहकांना अतिरिक्त सवलत देण्यासाठी ICICI बँक, बँक ऑफ बडोदा आणि वन कार्डसोबत पार्टनरशिप देखील केली आहे. सामान्य सवलतींव्यतिरिक्त, हे कार्ड वापरून पेमेंट व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांना 10% अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळेल.
‘या’ प्रोडक्ट्सवर मिळेल भारी डिस्काउंट
Mobile Phones: या उन्हाळी सेलमध्ये मोबाईल फोन आणि ॲक्सेसरीजवर 45% पर्यंत सूट मिळेल. OnePlus, Redmi आणि Realme सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सना सेल दरम्यान किमतीत कपात केली जाईल. सेलदरम्यान OnePlus 11R 5G, Redmi 13C, iQoo Z6 Lite, Realme Narzo 70 Pro 5G, आणि Redmi 12 5G इ. फोनवर सूट मिळण्याची पुष्टी झाली आहे.
लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि हेडफोन्सवर 75% पर्यंत सूट मिळण्याची पुष्टी करण्यात आली आहे. तर, टीव्ही आणि इतर उपकरणांवर 65% पर्यंत सूट मिळेल. Sony WH-1000XM4, Amazfit Active Smartwatch आणि Apple iPad (10th Gen) वर मोठ्या सवलती मिळतील.
होम अप्लायन्सेस आणि किचन सेटवर 70% पर्यंत सूट आणि फॅशन आणि सौंदर्य उत्पादनांवर 50% ते 80% पर्यंत सूट मिळेल.
या सेलमध्ये Amazon Echo, फायर टीव्ही आणि Kindle डिव्हाइसेसवर 45% पर्यंत सूट दिली जाईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.