Amazon सेलची वाट बघणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखेर Amazon ने Great Summer Sale ची घोषणा केली आहे. सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी सर्वप्रथम Amazonने आपल्या आगामी ग्रेट समर सेलची घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार, हा सेल 4 मे 2023ला सुरु होणार असून 8 मे 2023 पर्यंत चालणार आहे. दरम्यान, या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर वेगवेगळ्या ऑफर्सची माहिती मिळाली आहे. बघुयात सविस्तर –
या Amazon सेलमध्ये डील व्यतिरिक्त अतिरिक्त बँक ऑफर देखील मिळणार आहेत. Amazon India ICICI बँक किंवा कोटक महिंद्रा बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 10% इन्स्टंट डिस्काउंट देणार आहे. याशिवाय येथे EMI व्यवहारांवरही भारी सूट मिळेल.
Amazon ने अद्याप सर्व डील्स उघड केले नाहीत, परंतु काही ऑफर्स आणि डील्स टीझरच्या रूपात समोर आले आहेत. OnePlus Nord CE 3 Lite आणि iQOO 27 5G सह काही नवीन लाँचेस मोबाइल फोन आणि ऍक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट दिली जाईल.
याव्यवतिरिक्त, ऑफर्स बजेट फोनवर देखील मिळणार आहेत, ज्याची सुरुवात 5,899 रुपयांपासून होईल. तसेच, वापरकर्ते 1,555 रुपये दरमहापासून सुरू होणारे नो कॉस्ट EMI पर्याय देखील घेऊ शकतात.
लॅपटॉप आणि स्मार्टवॉचवर 75% पर्यंत फ्लॅट डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. लॅपटॉपवर ₹40,000 पर्यंत सूट आणि टॅब्लेटवर 60% पर्यंत सूट असेल.
Amazon च्या इन-हाउस प्रोडक्ट्सबद्दल बोलायचे झाल्यास Alexa Fire TV, Fire Stick वर 40% पर्यंत सूट दिली जाईल.