Amazon Great Republic Day Sale 2025: या वर्षातील पहिल्या सेलची तारीख जाहीर, निम्म्या किमतीत मिळतील महागडे फोन्स
Amazon India च्या वर्षातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या सेलचे आयोजन
येत्या आठडव्यात Amazon Republic Day Sale लाईव्ह होणार आहे.
SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% पर्यंत झटपट सूट
Amazon Great Republic Day Sale 2025: प्रसिद्ध आणि लोकप्रिय इ-कॉमर्स साईट Amazon India च्या वर्षातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या सेलचे आयोजन करण्यात येत आहे. होय, येत्या आठडव्यात Amazon Republic Day Sale लाईव्ह होणार आहे. ही सेल 13 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या दिवशी दुपारी 12 वाजता ही विक्री सुरू होणार आहे. मात्र, प्राइम मेंबर्ससाठी हा सेल नेहमीप्रमाणे काही वेळ आधी म्हणजेच मध्यरात्री 12 वाजता सुरू होणार आहे.
Amazon Great Republic Day Sale 2025
नेहमीप्रमाणेच या वेळीही प्राइम मेंबर्सना या सेलचा अर्ली ऍक्सेस मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्ही तुमचे आवडते कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गृहोपयोगी उपकरणे आणि मोबाईल फोन इ. प्रोडक्ट्स कमीत कमी किमतीत खरेदी करण्यास सक्षम असाल. लक्षात घ्या की, तुम्हाला SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% पर्यंत झटपट सूट मिळेल. ही सेल 13 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत लाईव्ह असेल.
निम्म्या किमतीत मिळतील महागडे फोन्स
Amazon Great Republic Day सेल दरम्यान तुम्हाला अनेक स्मार्टफोन अतिशय स्वस्त किमतीत मिळणार आहेत. जर तुम्ही नवीन महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याचे प्लॅन करत असाल तर, हीच योग्य वेळ आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon ने टीझरद्वारे काही सर्वोत्तम स्मार्टफोन डीलचे अनावरण केले आहे. तुम्हाला या सवलतीत सर्व बजेटचे फोन सवलतीसह खरेदी करण्याची संधी मिळेल.
सेल दरम्यान, नवीनतम OnePlus 13 आणि OnePlus 13R देखील सवलतीसह खरेदी करण्याची संधी मिळेल. तसेच, तुम्हाला iQOO च्या नवीन iQOO 13 फोनवर देखील आश्चर्यकारक सवलत मिळेल. केवळ iQOO 13 नाही तर, iQOO Neo 9 Pro आणि iQOO Neo 12, तसेच iQOO Z9 सिरीज देखील या Amazon सेलदरम्यान स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध असतील. सेलदरम्यान काही फ्लॅगशिप स्मार्टफोन्सदेखील मोठ्या प्रमाणात सवलतीसाठी मिळतील. Motorola Razr 50 Ultra, Tecno Phantom V Fold 5G, Vivo X200 Pro, Samsung Galaxy S23 Ultra आणि इतर अनेक फोन स्वस्त किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जातील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile