Amazon Great Indian Festival Sale ची अधिकृत तारीख जाहीर, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर 75% पर्यंत Discount। Tech News 

Amazon Great Indian Festival Sale ची अधिकृत तारीख जाहीर, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर 75% पर्यंत Discount। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival Sale 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

प्राइम सदस्यांसाठी ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 7 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12 पासून सुरू होईल.

मोबाईल डिव्‍हाइसेस आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट

ई-कॉमर्स दिग्गज Amazon आगामी सणासुदीच्या हंगामासाठी त्याच्या Amazon Great Indian Festival Sale सह परत आले आहे. सेलदरम्यान, तुम्हाला स्मार्टफोन्स, महागडे गॅजेट्सवर ऑफर्सचा वर्षाव होणार आहे. जर तूम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हीच उत्तम संधी आहे. अखेर आता कंपनीने या उत्सवाची तारीख जाहीर केली आहे. कंपनीने खुलासा केला आहे की, हा फेस्टिव्हल शॉपिंग सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, परंतु त्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

नेहमीप्रमाणे Amazon प्राइम मेम्बर्सना या सेलमध्ये लवकर ऍक्सेस मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्राइम सदस्यांसाठी ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 7 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12 पासून सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी सेल दरम्यान Amazon सर्व प्रोडक्ट्स कॅटेगरीवर डील्स आणि सूट देणार आहे. तसेच, कंपनी SBI क्रेडिट/डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% फ्लॅट डिस्काउंट देणार आहे.

Brands वर आश्चर्यकारक ऑफर उपलब्ध

The Great Indian Festival Sale मध्ये Apple, Asus, Lenovo, OnePlus, iQoo, Realme, Samsung, boAt आणि Sony सारख्या भारतीय आणि जागतिक ब्रँडवर डिस्काउंट ऑफर देण्यात येतील. याव्यतिरिक्त, अतिरिक्त कॅशबॅक ऑफर, नो-कॉस्ट EMI पर्याय आणि अतिरिक्त वॉरंटी देखील उपलब्ध असेल.

Amazon ने त्याच्या ई-कॉमर्स साइटवर विक्री सुरू होण्यापूर्वीच काही किकस्टार्टर डिल्स देखील लाईव्ह केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Samsung चे Galaxy S23, Nokia G42 5G, Moto Razr 40, Tecno Pova 5 Pro, Redmi 10 Power आणि Lava Agni 2 स्मार्टफोन सध्या प्लॅटफॉर्मवर डिस्काउंटसह सूचीबद्ध आहेत.

सेलदरम्यान ‘या’ प्रोडक्ट्सवर असेल किती डिस्काउंट?

Amazon च्या आगामी सेल दरम्यान प्लॅटफॉर्मवरील प्रोडक्ट्सच्या विविध कॅटेगरीजमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला जाईल. मोबाईल डिव्‍हाइसेस आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट, Alexa, Fire TV आणि Kindle डिव्‍हाइसेसवर 55% पर्यंत सूट आणि घर, किचन आणि होम अप्लायन्सेसवर 70% पर्यंत सूट असेल. याशिवाय, लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, टीव्ही आणि इतर उपकरणांवर 75% पर्यंत सवलतीसह उपलब्ध असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo