Amazon Great Indian Festival चा टीझर आला समोर, ‘या’ iPhone मॉडेल्सवर मिळेल आकर्षक सूट

Updated on 09-Sep-2022
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival सेलची घोषणा

iPhone मॉडेल्सवर मिळणार सवलत

AMAZON TV, होम अप्लायन्सेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवरही सूट देणार

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची अधिकृतपणे पुष्टी झाली आहे. Amazon ने अद्याप सेलच्या तारखा उघड केल्या नाहीत, परंतु सणासुदीच्या काळात या महिन्याच्या शेवटी सेलचे आयोजन होण्याची शक्यता आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल त्याच वेळी आयोजित करणे अपेक्षित आहे, जेव्हा FLIPKART त्याच्या बिग बिलियन डेज सेलचे आयोजन करेल. या दोन्ही विक्री या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : Vivo Ganesh Chaturthi Offer : तीन आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत, पहा यादी

Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान ऑफर केलेल्या डीलबद्दल अनेक तपशील उघड केले आहेत. मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे iPhones वर मोठ्या सवलती उपलब्ध असतील, प्रामुख्याने iPhone 12 आणि iPhone 13 सिरीजवर विशेष लाभ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या कालावधीत फ्लिपकार्ट iPhone 13 आणि इतर मॉडेल्सवरही मोठी सूट देईल. आता, यामुळे नवीन iPhone खरेदी करण्यासाठी सणासुदीचा काळ उत्तम आहे. 

शिवाय, Amazon टीझरने हे देखील उघड केले आहे की, ते iQOO 9T, OnePlus 10T, आणि इतर अनेक Samsung, Realme, Redmi, iQOO, Oppo, Vivo, Lava, Nokia फोन्ससह काही लोकप्रिय फोनवर सवलत देणार आहेत. याशिवाय AMAZON TV, होम अप्लायन्सेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवरही सूट देणार आहे.

 ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलसाठी, Amazon ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत अतिरिक्त 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट ऑफर करण्यासाठी भागीदारी केली आहे. ही बँक ऑफर SBI डेबिट तसेच क्रेडिट कार्डवर उपलब्ध असेल.

त्याबरोबरच, फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलचीही घोषणा केली आहे. फ्लिपकार्ट आणि AMAZON वर सेल  एकाच वेळी होईल. फ्लिपकार्टने फ्लॅट डिस्काउंट ऑफरसाठी ICICI आणि Axis बँक कार्डवर 10 टक्के झटपट सूट देण्यासाठी भागीदारी केली आहे.

आता, Amazon आणि Flipkart ने त्यांच्या सणासुदीच्याच्या काळातील सेलची घोषणा केल्यामुळे, नवीन iPhone मॉडेल मिळवण्यासाठी ही नक्कीच सर्वोत्तम वेळ आहे. तुम्हाला iPhone 13 विकत घ्यायचा असल्यास, iPhone 14 लाँच होण्याची वाट पाहणे आणि त्यानंतर Amazon किंवा Flipkart वरून फोन खरेदी करणे, तुमच्या सोयीचे दिले ठरेल. iPhone 14 च्या घोषणेनंतर, Apple iPhone 13 सीरीज तसेच iPhone 12 सीरीजच्या किंमती कमी करेल अशी अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :