‘या’ तारखेपासून Amazon Great Indian Festival sale 2022, मोबाईल-टीव्ही वर मिळेल प्रचंड सवलत
Great Indian Festival sale 2022 ची तारीख जाहीर
Amazon सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता
सेल समाप्तीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही
Amazon ने अखेर त्यांच्या Great Indian Festival sale 2022 ची तारीख जाहीर केली आहे. हा Amazon सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, तारखा बदलण्याणची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा सेल कधी संपणार याची तारीख कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. मागील वर्षांप्रमाणे यंदाही 24 ऑक्टोबरला होणाऱ्या दिवाळीपर्यंत विक्री सुरू राहण्याची शक्यता आहे. ऍमेझॉनने विक्रीसाठी एक मायक्रोसाइट तयार केली आहे, जी या सेलदरम्यान उपलब्ध होणाऱ्या ऑफरची झलक दाखवते.
हे सुद्धा वाचा : WhatsApp अँड्रॉइड मधील मीडिया प्रॉब्लमचे निराकरण कसे करावे? बघा अगदी सोपा मार्ग
Amazon सेलमध्ये लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, कॉम्प्युटर पेरिफेरल्स, स्मार्ट गॅझेट्स आणि ऍमेझॉन डिव्हाइसेससह विविध गोष्टींवर सवलत आणि ऑफर मिळतील.
'या' बँक कार्डांवर कॅशबॅक आणि झटपट सूट
Amazon ने SBI सोबत भागीदारी केली आहे. SBI क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरून तुम्ही 10 टक्क्यांपर्यंत झटपट सूट मिळवू शकता. या प्लॅटफॉर्मवरून पहिल्यांदा खरेदी करणाऱ्यांना फ्लॅट 10 टक्के कॅशबॅक मिळेल. प्राइम सदस्यांना सेलदरम्यान उपलब्ध डील आणि सवलतींमध्ये लवकर प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल डील
> मोबाईल आणि ऍक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट मिळणार आहे. काही Samsung, Xiaomi आणि iQOO उपकरणांवर विशेष ऑफर असतील. सेलमध्ये Apple iPhones वरही सूट दिली जाणार आहे. Xiaomi Redmi 11 Prime 5G आणि iQOO Z6 Lite 5G असे काही नवीन लॉन्च देखील केले जातील जे सेलमध्ये उपलब्ध केले जातील.
> सेलमध्ये मोबाईलशिवाय लॅपटॉपवरही सूट मिळणार आहे. असे म्हटले जात आहे की एलजीच्या ग्राम सीरीज मॉडेल्सच्या सेलमध्ये 30 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
> टीव्हीवर 70 टक्के सूट, तर रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनवर 50 टक्क्यांपर्यंत सूट असणार आहे.
> गेमिंग डिव्हाइसेस आणि ऍक्सेसरीजवर 50% पर्यंत सूट आहे. यामध्ये कन्सोल, कंट्रोलर, हेडफोन, गेम डिस्क आणि बरेच काही समाविष्ट असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile