बहुप्रतीक्षित Amazon Great Indian Festival 2024 सेलची तारीख जाहीर, निम्म्याहून कमी किमतीत भारी प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी

Updated on 17-Sep-2024
HIGHLIGHTS

Amazon ने Amazon Great Indian Festival 2024 सेलचे आयोजन केले आहे.

Amazon Great Indian Festival 2024 सेल पुढील आठवड्यात सर्व सदस्यांसाठी सुरु होईल.

Amazon ने आगामी वार्षिक विक्रीसाठी एक डेडिकेटेड वेब पेज देखील तयार केले आहे.

लवकरच दिवाळीचा सण येणार आहे आणि सणासुदीनिमित्त प्रसिद्ध शॉपिंग साईट Amazon India वर महासेलचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही Amazon ने Amazon Great Indian Festival 2024 सेलचे आयोजन केले आहे. दरम्यान, कंपनीने अखेर आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या सेलची तारीख देखील जाहीर केली आहे. होय, Amazon Great Indian Festival 2024 सेल 27 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.

एवढेच नाही तर, Amazon ने आगामी वार्षिक विक्रीसाठी एक डेडिकेटेड वेब पेज देखील तयार केले आहे. ज्याद्वारे या सेलदरम्यान मिळणाऱ्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर प्रोडक्ट्सवरील डील्स उघड करण्यात आले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Flipkart च्या Big Billion Days सेलदेखील 27 सप्टेंबरपासूनच सुरू होणार आहे.

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2024 तारीख

वर सांगितल्याप्रमाणे, यावर्षी हा Amazon सेल येत्या 27 सप्टेंबरपासून होणार आहे. हा सेल या वर्षी 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दिवाळीपर्यंत चालेल, अशी अपेक्षा आहे. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल साधारणपणे तीन टप्प्यांमध्ये असतो. लक्षात घ्या की, या सेलदरम्यान सुरुवातीच्या टप्प्यात आणि दिवाळीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या सवलती दिल्या जातात. ग्राहकांना आपले आवडते प्रोडक्ट स्वस्त किमतीत खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. दरवर्षीप्रमाणे, Amazon प्राइम सदस्यांना सेलसाठी लवकर ऍक्सेस देणार आहे. म्हणजेच Amazon प्राइम सदस्यांना इतर वापरकर्त्यांच्या एक दिवस आधी या सेलचा ऍक्सेस मिळेल.

Amazon Great Indian Festival 2024 ऑफर्स

बँक ऑफर्स

कंपनीने सांगितल्यानुसार, Amazon ग्राहकांना SBI डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटवर 10% इन्स्टंट डिस्काउंट देणार आहे. या विक्रीमध्ये इझी रिटर्न्स आणि पहिल्या ऑर्डरवर फ्री डिलिव्हरीसह कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट देखील केले जाणार आहे. त्याबरोबरच, सेल सुरू होण्यापूर्वीच Amazon ने खुलासा केला आहे की, या सेलमध्ये iPhone 13 केवळ 38,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध होईल.

इतर ऑफर्स

Amazon Great Indian Festival Sale 2024 मध्ये फॅशन, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस आणि बरेच काही यासारख्या प्रोडक्ट्सवर प्रचंड सवलती मिळणार आहेत. या सेलमध्ये सॅमसंग, Apple, Oppo, OnePlus, Realme आणि इतर ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता आहे. तर, मोठ्या ब्रँड्सचे म्हणजेच Samsung, Sony, LG आणि इतर कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हीवरही सूट मिळू शकते. याशिवाय, वापरकर्त्यांना इअरबड्स, स्मार्टवॉच आणि इतर प्रोडक्ट्सवरही मोठ्या प्रमाणात सुट मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :