Amazon Great Freedom Festival Sale 2023: आगामी सेलमध्ये होणार ऑफर्सचा वर्षाव, स्मार्टफोन्सवर 40% सूट

Amazon Great Freedom Festival Sale 2023: आगामी सेलमध्ये होणार ऑफर्सचा वर्षाव, स्मार्टफोन्सवर 40% सूट
HIGHLIGHTS

कंपनीने Amazon Great Freedom Festival Sale 2023 या मोठ्या सेलची घोषणा केली आहे.

SBI कार्ड वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% त्वरित सूट मिळेल.

ग्राहकांना 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक घेण्याची संधी मिळेल.

Amazon हे भारतातील सर्वात मोठ्या शॉपिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. अलीकडेच Amazon ने प्राइम डे 2023 सेल आयोजित केला आहे. पण ही सेल केवळ प्राईम मेम्बर्ससाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र, आता साईटच्या सर्व ग्राहकांसाठी येत्या काळात नव्या सेलचे आयोजन करण्यात येणार आहे. आता कंपनीने Amazon Great Freedom Festival Sale 2023 या मोठ्या सेलची घोषणा केली आहे. हा सेल पुढील महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. नव्या सेलमध्ये ऑफर्सचा वर्षाव होणार आहे, बघुयात सविस्तर तपशील- 

Amazon Great Freedom Festival Sale 2023 

Amazon Great Freedom Festival Sale 2023 हा सेल 5 दिवसांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. हे भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधी म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी सुरू होऊन 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. लक्षात घ्या की, जर तुम्ही प्राइम मेंबर असाल तर हा सेल तुमच्यासाठी 12 तास अगोदर सुरू होणार आहे. म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकता. 

Amazon Great Freedom Festival Sale 2023 डिल्स आणि ऑफर्स 

ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलसाठी Amazonने अजून ऑफर्स आणि डील्सबद्दल अधिक माहिती दिलेली नाही  पण,  कंपनीने काही टीझर्स शेअर केले आहेत. सर्व प्रथम, SBI कार्ड वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% त्वरित सूट मिळेल. ग्राहकांना 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक घेण्याची संधी मिळेल. याशिवाय, तुम्हाला 30 लाखांपेक्षा जास्त प्रोडक्ट्सवर 30% पर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. तसेच Amazon बेस्ट सेलिंग कॉम्बोवर 40% पर्यंत सूट देणार आहे.

स्मार्टफोन्सवर 40% पर्यंत सूट

Amazon ने यावर्षीच्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलसाठी स्मार्टफोन आणि ऍक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट जाहीर केली आहे. 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI पर्याय मिळेल. तर, 35,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डील उपलब्ध होणार आहे. कंपनीने अद्याप डीलच्या विशिष्ट किंमती जाहीर केल्या नाहीत, परंतु या सेल दरम्यान उपलब्ध होणाऱ्या डिल्स पुढीलप्रमाणे असू शकतात.

> लॅपटॉप आणि गेमिंग लॅपटॉपवर 40% पर्यंत सूट. > स्मार्टवॉचवर 80% पर्यंत सूट हेडफोन, स्पीकर आणि संगणक उपकरणांवर 75% पर्यंत सूट. > टॅब्लेटवर 50% पर्यंत सूट. > अलेक्सा, फायर टीव्ही आणि किंडल डिव्हाइसेसवर 55% पर्यंत सूट. > स्टोरेज डिव्हाइसवर 70% पर्यंत सूट. > स्मार्ट टीव्हीवर 60% पर्यंत सूट. > प्रीमियम टीव्हीवर 55% पर्यंत सूट असेल. 

iQOO Quest Days, Dell Days आणि JBL Brand Week

 तुम्हाला iQOO, Dell किंवा JBL प्रोडक्ट्स खरेदी करायचे असतील तर, iQOO क्वेस्ट डेज, डेल डेज आणि JBL ब्रँड वीकचे सेल सध्या सुरू आहे. तुम्ही या सेलमधील ऑफर्सचा लाभ घेऊन सर्व उपकरणे स्वस्तात खरेदी करू शकता. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo