Amazon GIF Sale 2023 चा पहिला दिवस, बघा महागड्या टॅबलेट्सवरील Best डील्स। Tech News

Updated on 08-Oct-2023
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival Sale 2023 सर्व सदस्यांसाठी लाईव्ह

SBI बँकिंग कार्ड वापरून 10% झटपट सूट मिळवू शकता.

Apple, Samsung इ. सारख्या टॉप ब्रँड्सच्या टॅब्लेटवर मोठ्या सवलतीच्या ऑफर देण्यात येत आहेत.

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. Amazon Great Indian Festival Sale 2023 सर्व सदस्यांसाठी लाईव्ह करण्यात आला आहे. Amazon सेल पुन्हा एक्साइटिंग सवलतींसह आणि विविध कॅटेगरीजमध्ये विशेष ऑफरसह परतला आहे. सेल दरम्यान, क्रेडिट कार्ड वापरून तब्बल 10,000 रुपयांपर्यंत सूट आणि SBI बँकिंग कार्ड वापरून 10% झटपट सूट मिळवू शकता.

आम्ही तुम्हाला सांगतो की, Apple, Samsung इ. सारख्या टॉप ब्रँड्सच्या टॅब्लेटवर मोठ्या सवलतीच्या ऑफर देण्यात येत आहेत. जर तुम्हाला नवीन टॅबलेट खरेदी करायचा असेल तर, आम्ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन्सची यादी तयार केली आहे.

Apple 2022 iPad Air M1 chip

Apple 2022 iPad Air M1 Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 45,998 रुपयांमध्ये सूचीबद्ध केले गेले आहे. या उपकरणावर तुम्हाला मूळ किमतीवर थेट 23% ची सूट मिळत आहे. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. सूट मिळणार आहे. तुम्ही ते ब्लू, पर्पल, पिंक, स्टारलाइट आणि स्पेस ग्रे कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. येथून खरेदी करा

Samsung Galaxy Tab S6 Lite

हा सॅमसंग टॅबलेट Amazon डीलमध्ये 35% डिस्काउंटसह 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. यासोबत बॉक्समध्ये एस-पेनही उपलब्ध आहे. बँक ऑफर्स आणि नो कॉस्ट EMIसह टॅबलेट स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. हे उपकरण 10.4-इंचाच्या डिस्प्लेसह येते.याशिवाय फोटोग्राफीसाठी यात 8MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. येथून खरेदी करा

Xiaomi Pad 6

Xiaomi Pad 6 ची मूळ किंमत Amazon वर 41,999 रुपये आहे, परंतु ती सध्या ई-कॉमर्स साइटवर पूर्ण 38% सूटसह उपलब्ध आहे. या डिस्काउंटनंतर, डिव्हाइसची किंमत केवळ 25,999 रुपयांवर आली आहे. यावर तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. ऑफर्स मिळणार आहेत. याशिवाय यात 11 इंच 144Hz डिस्प्ले आहे. येथून खरेदी करा

Redmi Pad

रेडमी पॅड तुम्हाला अगदी अर्ध्या किमतीत मिळणार आहे. आता तुम्ही केवळ 14,499 रुपयांमध्ये हे खरेदी करू शकता. एवढेच नाही, जर तुम्ही बँक ऑफर्स आणि नो कॉस्ट EMI चा लाभ घेतला तर याची किंमत आणखी कमी होईल. हा टॅबलेट ग्रॅफाइट ग्रे आणि मिस्ट ब्लु कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :