अॅमेझॉनने आपल्या फायर HD 10 टॅबलेटचा अॅल्युमिनियम व्हर्जन लाँच केला आहे. ह्या नवीन टॅबलेटमध्ये 64GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे आणि हा ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध आहे.
अॅमेझॉन फायर HD 10 च्या 16GB व्हर्जन डॉलर 229 (जवळपास १५,५०० रुपये) च्या किंमतीत उपलब्ध आहे. ह्याच्या 32GB व्हर्जनची किंमत डॉलर २५९ (जवळपास १७,५०० रुपये) आहे आणि 64GB व्हर्जनची किंमत डॉलर 289 (जवळपास १९,५०० रुपये) आहे. हा टॅबलेट काळा, पांढरा आणि सिल्वर अॅल्युमिनियम रंगात उपलब्ध आहे. तथापि, ह्या टॅबलेटचा सिल्वर अॅल्युमिनियम व्हर्जन केवळ 64GB च्या अंतर्गत स्टोरेजसह मिळेल. ह्या टॅबलेटच्या अन्य फीचर्स जुन्या व्हर्जनसारखेच आहेत.
हेदेखील वाचा – झोलो वन HD रिव्ह्यू
ह्या टॅबलेटमध्ये 1.10 इंचाची IPS डिस्प्ले दिली आहे, ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 149ppi आहे. हा टॅबलेट 1.5GHx क्वाड-कोर मिडियाटेक प्रोसेसरसह लाँच केला आहे. ह्यात 1GB रॅमसुद्धा देण्यात आली आहे. ह्याचे स्टोरेज आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. हा वायफाय आणि 3.5mm ऑडियो स्टिरियो जॅकने सुसज्ज आहे. हा फायर ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्याचा आकार 262x159x7.7mm आणि वजन 432 ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 एजमध्ये असू शकतो ड्यूल कॅमेरा सेटअप
हेदेखील वाचा – HP चा हा नोटबुक आहे आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका नोटबुक