सध्या Amazon वरून स्वस्तात टॅबलेट खरेदी करण्याची संधी आहे. होय, लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास टॅबलेट्सवर अप्रतिम सूट देत आहे. याव्यतिरिक्त, टॅबलेट नो कॉस्ट EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, टॅबलेटवर उत्कृष्ट एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. Apple पासून ते Samsung पर्यंत अनेक कंपन्यांच्या टॅबलेटवर सूट मिळत आहे. बघुयात सर्वोत्तम टॅबलेट्सची यादी-
Apple च्या या टॅबलेट ची किंमत 57,900 रुपये आहे. सध्या, तुम्ही Amazon वरून खरेदी केल्यास, तुम्हाला HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट करण्यावर 4000 रुपयांची सूट मिळत आहे. यामध्ये 10.9 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. टॅबलेटमध्ये 12MP बॅक कॅमेरा आहे. यात 64GB स्टोरेज आहे. यात WiFi 6 आणि इतर अनेक फीचर्स मिळतील. येथून खरेदी करा
हे सुद्धा वाचा: बहुप्रतीक्षित Xiaomi 14 Ultra चे ग्लोबल मॉडेल Geekbench वर सूचीबद्ध, पुढील महिन्यात होणार लाँच। Tech News
Amazon वर Samsung Galaxy Tab S6 Lite ची किंमत 23,934 रुपये आहे. HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची सूट आहे. हे टॅब्लेट एक्सचेंज ऑफरसह देखील खरेदी केले जाऊ शकतात. तसेच, तुम्ही अगदी कमी मासिक हप्त्यांवर खरेदी करू शकता. सॅमसंगच्या या टॅबलेटमध्ये 10.4 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. टॅबसेट एस-पेन सपोर्टसह येतो. हे डॉल्बी ॲटमॉस साउंड क्वालिटीसह येते. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. येथून खरेदी करा
हा Lenovo टॅबलेट 20,999 रुपये किमतीसह सूचीबद्ध आहे. जेव्हा तुम्ही Amazon वरून खरेदी करता तेव्हा तुम्हाला Amex क्रेडिट कार्डवर 3500 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 10.6 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. टॅबलेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, यामध्ये 13MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. टॅबलेटमध्ये 7700mAh बॅटरी देण्यात आली आहे. Buy From Here