Huamiने Amazfit T-Rex 2 स्मार्टवॉच लाँच केली आहे. ही वॉच अमेरिकेत सादर करण्यात आली आहे. तसेच, ती युरोपमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यात सिलिकॉन स्ट्रॅपदेखील दिले गेले आहेत. ही वॉच दमदार बॅटरी लाइफसह येते, जी 45 दिवसांपर्यंत चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन स्मार्टवॉचची किंमत आणि फीचर्स….
Amazfit स्मार्टवॉचमध्ये 454×454 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.39-इंच AMOLED टचस्क्रीन आहे. तसेच, यात 500mAh ची रेट केलेली बॅटरी आहे, जी सुमारे दोन तासात पूर्णपणे चार्ज होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे स्मार्टवॉच सामान्य वापरासह 24 दिवस टिकण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, यात बॅटरी सेव्हर मोड आहे जो 45 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप वाढवू शकतो, असा दावा केला जातो.
Huami ने Amazfit T-Rex 2 स्मार्टवॉच हे ड्युअल-बँड पोजिशनिंगसह पॅक केले आहे. तसेच यामध्ये पाच-सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीमचे सपोर्ट दिले गेले आहे. या स्मार्टवॉचला मिलिट्री-ग्रेड ड्युरेबिलिटी ऑफर करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. कंपनीचा दावा आहे की, Amazfit T-Rex 2 -30°C पर्यंतच्या तापमानात काम करू शकते. याव्यतिरिक्त, ही वॉच वॉटर रेसिस्टेंट देखील आहे. Amazfit T-Rex 2 चा वापर रक्तातील ऑक्सिजन मोजण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय, यात 150 हून अधिक गेम मोड समाविष्ट आहेत.
Amazfit T-Rex 2 स्मार्टवॉच Amazfit US साइटवर उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची किंमत $229.99 म्हणजेच अंदाजे 18,000 रुपये आहे. ही वॉच ऍस्ट्रो ब्लॅक अँड गोल्ड, डेझर्ट खाकी, अंबर ब्लॅक आणि वाइल्ड ग्रीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही स्मार्टवॉच 1 जूनपासून इटली, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये EUR 229.9 म्हणजेच अंदाजे 19,000 रुपये या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होईल.