2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी आतापर्यंत काही बरे राहिलेले नाही. यावर्षी हिंदी भाषेत बनलेल्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. मात्र, इंडस्ट्रीत अशी एक अभिनेत्री आहे जिच्यासाठी हे वर्ष सर्वोत्तम गेले. या वर्षात अभिनेत्री भूमिका असलेले सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. ती म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री 'आलिया भट्ट' होय. जिथे एकीकडे कंगना राणौत, क्रिती सेनॉन आणि करीना कपूर या अभिनेत्रींचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. तर आलियाच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.
हे सुद्धा वाचा : Tecno चा सर्वात स्टायलिश फोन भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये तब्बल 37 दिवस चालेल बॅटरी
चला जाणून घेऊया आलियाच्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कसे होते ?
गंगूबाई काठियावाडी हा आलिया भट्टचा यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट होता. कोरोना महामारीनंतर चित्रपटगृहे उघडल्यानंतर हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचा परफॉर्मन्स चांगलाच गाजला होता. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाने तिकीट खिडकीवर 129.10 कोटींची कमाई केली.
राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'आरआरआर' ची दक्षिणेसह हिंदी पट्ट्यातील लोक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटात आलिया भट्टही दिसली होती. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर व्यवसाय केला. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने केवळ हिंदी पट्ट्यात 274.31 कोटींची कमाई केली होती.
'ब्रह्मास्त्र' हा आलिया भट्टचा या वर्षातील तिसरा चित्रपट आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आलिया ईशाच्या भूमिकेत दिसली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने एकूण 173.20 कोटींचा व्यवसाय केला आहे. आगामी काळात हा चित्रपट अनेक विक्रम करेल, असा विश्वास आहे.