MWC 2016 : अल्काटेल टू इन वन विंडोज टॅबलेट प्लस १० लाँच
ह्या टॅबलेटसह डिचेबल कीबोर्डसुद्धा उपलब्ध आहे. ह्या डिचेबल बोर्डमध्ये अनेक खास फीचर्स दिले गेले आहे, ज्यात कीबोर्डमध्ये वापरली गेलेली 2580mAh ची बॅटरी दिली गेेली आहे.
मोबाइल डिवायसेस निर्माता कंपनी अल्काटेलने आपला टू इन वन विंडोज टॅबलेट प्लस 10 सादर केला आहे. हा टॅबलेट विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.
ह्या टॅबलेटसह डिचेबल कीबोर्डसुद्धा उपलब्ध आहे. ह्या डिचेबल बोर्डमध्ये अनेक खास फीचर्स दिले गेले आहे, ज्यात कीबोर्डमध्ये वापरली गेलेली 2580mAh ची बॅटरी दिली गेेली आहे. ह्या टॅबलेटशी अटॅच केल्यावर बॅटरी पॉवर वाढून 8410mAh होते. तर दुसरीकडे ह्या कीबोर्डमध्ये वायफाय हॉटस्पॉटची सुविधा दिली गेली आहे, ज्याच्या मदतीने एकाचवेळी १५ डिवाइस इंटरनेटशी कनेक्ट केले जाऊ शकतात.
अल्काटेल प्लस 10 टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 10 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.92GHz इंटेल क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकता.
सध्यातरी अल्काटेलच्या कॅमे-याविषयी कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. मात्र ह्याच्या रियर आणि फ्रंट फेेसिंग कॅमे-यामध्ये फ्लॅश असल्याचे सांगण्यात येतय.
अल्काटेल प्लस 10 टॅबलेट मॅटेलिक, सिल्वर, सफेद आणि काळ्या रंगात उपलब्ध होईल. अल्काटेल प्लस १० जून २०१६ पर्यंत युरोप, लॅटिन अमेरिका आणि मध्य ई्स्ट आफ्रिकेमध्ये उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा – MWC 2016: ZTE ब्लेड V7 आणि ब्लेड V7 लाइट स्मार्टफोन्स लाँच
हेदेखील वाचा – MWC 2016 – लाँच झाला LG G5 स्मार्टफोन