हा स्मार्टफोन 1.3GHz मिडियाटेक MT8312 ड्यूल कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 4GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अल्काटेल वनटचने आपला नवीन टॅबलेट पिक्सी 3 सादर केला. कंपनीने ह्याप्रसंगी केअरटाइम चिल्ड्रनचा GPS ट्रेकर स्मार्टवॉच आणि पिक्सी 4 सीरिजचे नवीन स्मार्टफोनसुद्धा सादर केले. तथापि, ह्या डिवाइसविषयी कंपनीकडून जास्त माहिती मिळालेली नाही.
अल्काटेल वनटच पिक्सी 3 टॅबलेटचे वैशिष्ट्य म्हणजे हा विंडोज 10 मोबाईल ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो, कंपनीचा दावा आहे की, विंडोज 10 मोबाईल ओएसला टॅबलेटसाठी ऑप्टिमाइज केले गेले आहे. विंडोजवर आधारित पिक्सी 3 टॅबलेटची किंमत आणि उपलब्धतेविषयी काही विशेष माहिती मिळालेली नाही.
ह्या टॅबलेटचा वापर टिव्ही रिमोट कंट्रोल म्हणून केला जाऊ शकतो. ह्यात व्हॉइस कॉलिंग आणि GPS फीचरसुद्धा आहे.
अल्काटेल वनटच पिक्सी 3 टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ८ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz मिडियाटेक MT8312 ड्यूल कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 4GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.