Amazon Prime Videoने मंगळवारी बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या हिस्टोरिकल ड्रामाच्या स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा केली. हा चित्रपट 3 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता हा चित्रपट 1 जुलैपासून हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
हे सुद्धा वाचा : Vivo चा 10,000 रुपयांपेक्षा स्वस्तात येणारा मस्त स्मार्टफोन, मिळतील अगदी आकर्षक फीचर्स
चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटात अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, संजय दत्त, सोनू सूद इ. कलाकार आहेत.
कवी चंद वरदाई यांच्या "पृथ्वीराज रासो" या महाकाव्यावर आधारित हा ऐतिहासिक ड्रामा आहे. यामध्ये चाहमना घराण्यातील पृथ्वीराज चौहानच्या मुख्य नायकाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज केल्यानंतर ही कथा प्रत्येकासोबत शेअर करण्यास मी उत्सुक आहे.
अभिनेता पुढे म्हणाला की, "सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका पडद्यावर साकारता आली याचा मला अभिमान वाटतो. 1 जुलैपासून ऍमेझॉन प्राइम व्हिडिओद्वारे ही महाकथा आता प्रत्येक घराघरात पोहोचवण्यास मी उत्सुक आहे आणि मला याबाबत आनंद आहे. एक महान भारतीय योद्धा आणि पराक्रमी राजा सम्राट पृथ्वीराज चौहान यांची प्रेरणादायी कथा याद्वारे जगभरात पोहोचेल."