युजर्सच्या मनोरंजनासाठी Airtel सज्ज! Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar पूर्णपणे मोफत

Updated on 13-Jan-2023
HIGHLIGHTS

मोफत OTT सब्सक्रिप्शनसह येणारे Airtel प्लॅन्स

यासह AIRTEL कडे दोन पोस्टपेड प्लॅन आहे.

Netflix प्रीमियम सब्सक्रिप्शनसाठी फक्त 150 रुपये खर्च

तुम्ही जर Airtel चे पोस्टपेड ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Airtel ने ग्राहकांच्या मनोरंजनाची मोठी तयारी केली आहे. तुम्ही Netflixचा 649 रुपयांचा प्रीमियम प्लॅन फक्त 150 रुपयांमध्ये मिळवू शकता. म्हणजेच तुम्हाला तब्ब्ल 500 रुपयांची सूट मिळेल. एअरटेल त्याच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अनेक OTT प्लॅटफॉर्म विनामूल्य ऑफर करते. यासाठी दोन पोस्टपेड प्लॅन आहेत, ज्यात नेटफ्लिक्स प्लॅन विनामूल्य उपलब्ध आहे. परंतु प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 150 रुपये खर्च करावे लागतील. 

हे सुद्धा वाचा : नववर्षात नवीन लाँच झालेल्या आणि आगामी स्मार्टफोन्सची यादी, मिळतील अप्रतिम फिचर

Airtel 1199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

 या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. याशिवाय, 150GB मासिक डेटा उपलब्ध आहे, त्यासोबत 3 फ्री ऍड ऑन व्हॉइस कनेक्शन उपलब्ध आहेत. प्रत्येक कनेक्शनला 200GB पर्यंत रोलओव्हरसह 30GB डेटा मिळतो. एका महिन्यासाठी Netflix Basic, 6 महिन्यांसाठी Amazon Prime आणि 1 वर्षासाठी Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये, ग्राहक नेटफ्लिक्स प्रीमियम प्लॅन मिळवण्यासाठी दरमहा 450 रुपये भरून नेटफ्लिक्स स्टॅंडर्डमध्ये अपग्रेड करू शकतात.

Airtel 1499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

1499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन एअरटेलचा सर्वात महागडा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 200GB चा मासिक डेटा उपलब्ध आहे आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. प्लॅनमध्ये कुटुंबातील चार सदस्यांना Uri ऍड ऑन व्हॉइस कनेक्शनची ऑफर दिली जाते आणि प्रत्येक जोडणीला 200GB पर्यंत रोलओव्हरसह 30GB डेटा मिळतो. याशिवाय दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. 

Netflix चा स्टॅंडर्ड मंथली प्लॅन, Amazon Prime 6 महिन्यांसाठी आणि Disney + Hotstar चे सदस्यत्व एका वर्षासाठी उपलब्ध आहे. Netflix प्रीमियम मिळवण्यासाठी, ग्राहकाला या प्लॅनवर अतिरिक्त 150 रुपये द्यावे लागतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :