AIRTEL पेमेंट बँकमधून मिनी स्टेटमेंट आणि बँक बॅलन्स ची माहिती मिळवता येते.
दूरसंचार कंपन्यांमधील दिग्गज कंपनी AIRTEL आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी सतत नव्या नव्या सर्व्हिसेस आणि रिचार्ज प्लॅन्स जाहीर करत असते. ऑनलाईन पेमेंटची पद्धत आल्यामुळे बहुतेक लोक आपल्या खिशामध्ये रक्कम रक्कम ठेवत नाही. पण आता एक नवीन तंत्रज्ञान आले आहे. ज्यामध्ये UPI, क्रेडिट आणि डेबिटची गरज भासणार नाही. AIRTEL पेमेंट्स बँककडून एक सेवा जरी करण्यात आली आहे. ज्यात पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना फक्त चेहरा दाखवावा लागेल.
फेस रिकग्निशन पेमेंट सर्व्हिस
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम AIRTEL पेमेंट बँकमध्ये अकाउंट ओपन करणे आवश्यक आहे. त्यानंतर, अगदी कुठलीही बाकीची किरकिर न ठेवता ग्राहक आधार क्रमांक आणि चेहरा दाखवून पेमेंट करण्यास सक्षम असणार आहेत. ही बँकेची आधार इनेबल्ड पेमेंट सर्व्हिस असल्याचे सांगितले गेले आहे. यासाठी कंपनीने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI सोबत पार्टनरशिप केली आहे.
AIRTEL पेमेंट बँक
AIRTEL पेमेंट बँकमधून मिनी स्टेटमेंट आणि बँक बॅलन्स अशाप्रकारची माहिती मिळवता येते. त्याबरोबरच आता फेस म्हणजेच चेहरा दाखवून पेमेंट देखील करता येईल. महत्त्वाचे म्हणजे तुमचे AIRTEL पेमेंट्स बँकेत अकाउंट नसेल तरीही तुम्हाला NPCI गाईडलाईन्स नुसार पेमेंट व्यवहार करता येईल.
मात्र, फेस आयडेंटिफिकेशनसह ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना आधार कार्ड क्रमांक देणे आवश्यक आहे. याद्वारे बँक वापरकर्त्यांचे वेरिफिकेशन करणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.