एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी आणली दिवाळीची विशेष भेट

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी आणली दिवाळीची विशेष भेट
HIGHLIGHTS

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी कॅशबॅक, फॅमिली डाटा आणि गिफ्टची घोषणा केली आहे. ह्यात एअरटेल डाटा यूजर ऑफरचा लाभ केवळ प्रीपेड ग्राहकच घेऊ शकतात. मात्र कंपनीचे असे म्हणणे आहे की, लवकरच त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांसाठीसुद्धा ही सेवा उपलब्ध केली जाईल.

दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलीय आणि दिवाळीचे औचित्य साधून सर्व कंपन्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स सादर करतायत. ह्यालाच समोर ठेवून भारती एअरटेलने स्मार्टफोन ग्राहकांना कॅशबॅक, फॅमिली डाटा आणि गिफ्टची घोषणा केली आहे. ह्यातील एअरटेल डाटा यूजर ऑफरचा लाभ केवळ प्रीपेड ग्राहकच घेऊ शकतात. मात्र कंपनीचे असे म्हणणे आहे की, लवकरच त्याच्या पोस्टपेड ग्राहकांसाठीसुद्धा ही सेवा उपलब्ध केली जाईल.

 

भारतातील प्रमुख मोबाईल सेवा प्रदाता कंपनी भारती एअरटेल डाटा वापरावर ग्राहक ५० टक्के कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. मात्र ही सुविधा रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत वापरलेल्या डाटावरच लागू होईल.  

जर तुम्हीसुद्धा एअरटेल ग्राहक असाल, आणि आपणसुद्धा ह्या ऑफरचा लाभ घेऊ इच्छिता, तर आपण आपल्या फोनवर टाइप करा SMS <नाइट> आणि पाठवा १२१ वर किंवा आपण <5555> वर मिस्ड कॉलसुद्धा करु शकता.

त्याशिवाय ह्या ऑफरचा लाभ एका दुस-या पद्धतीनेसुद्धा घेता येईल. त्यासाठी आपल्याला  ‘माय एअरटेल’ अॅप च्या माध्यमातून लॉग इन करावे लागेल आणि त्यानंतर आपण ह्याचा लाभ घेऊ शकता.

एअरटेलने मागील वर्षी पोस्टपेड ग्राहकांसाठी सादर केलेल्या फॅमिली डाटा शेअर प्लॅन आता 3G आणि 4G प्रीपेड ग्राहकांसाठीसुद्धा उपलब्ध केला आहे. ह्या प्लॅनद्वारे ग्राहक ४ लोकांसोबत आपला 3G आणि 4G डेटा पॅक शेअर करु शकता. ही सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना <शेअर> टाइप करुन १२१ वर SMS करावा लागेल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo