फक्त 98 रुपयांमध्ये मिळेल दररोज 2 GB डेटा, ‘या’ दोन रिचार्ज प्लॅन्ससमोर Airtel-Jio देखील फेल

फक्त 98 रुपयांमध्ये मिळेल दररोज 2 GB डेटा, ‘या’ दोन रिचार्ज प्लॅन्ससमोर Airtel-Jio देखील फेल
HIGHLIGHTS

98 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज GB डेटा

447 रुपयांच्या प्लॅनसह आकर्षक ऑफर्स

OTT बेनिफिटसह दोन्ही रिचार्ज प्लॅन

Reliance Jio , VI आणि Airtel या प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सची किंमत वाढवल्यामुळे ग्राहकांचा इतर कंपन्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सकडे कल वाढतोय. त्यामुळे या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी BSNLकडे अनेक प्रीपेड योजना आहेत. प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांप्रमाणे, BSNL देखील त्यांच्या काही रिचार्ज योजनांसह OTT फायदे ऑफर करते. या लेखात आम्ही तुम्हाला BSNLच्या अशाच दोन प्लॅनबद्दल सांगत आहोत. BSNL च्या या 2 प्लॅनची ​​किंमत मात्र 98 रुपये आणि 447 रुपये इतकी आहे.

BSNLचा 98 रुपयांचा प्लॅन: 

या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे BSNLच्या 98 रुपयांसारखा रिचार्ज प्लॅन इतर कोणत्याही कंपनीकडे नाही. 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा ऑफर केला जातो. प्लॅनची ​​वैधता एकूण 22 दिवस आहे. म्हणजेच  तुम्हाला एकूण 44 GB हाय स्पीड डेटा मिळेल. त्याबरोबरच, OTT बेनिफिट म्हणून Eros Now Entertainment चे मोफत सब्स्क्रिप्शन देखील दिले जाते. मात्र, हे फक्त एक डेटा व्हाउचर आहे. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा उपलब्ध नाही.

BSNLचा 447 रुपयांचा प्लॅन: 

कंपनीचा दुसरा प्लॅन हा 447 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 100 GB डेटा दिला जातो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, वेग 80Kbps पर्यंत कमी होईल. प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. यामध्ये OTT बेनिफिट म्हणून Eros Now Entertainmentचे मोफत सब्स्क्रिप्शन देखील दिले जाते. तसेच, या व्यतिरिक्त ग्राहकांना BSNL ट्यून्सचे देखील ऍक्सेस दिले जाईल.

इतर कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये काय?

 Reliance Jio , VI आणि Airtel यांसारख्या कंपन्यांच्या प्रीपेड रिचार्जमध्ये, तुम्हाला दररोज 1 ते 2 GB डेटा मिळेल. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 100 SMSचा लाभ देखील मिळेल. याशिवाय, OTT बेनिफिट म्हणून डिझनी+ हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन मिळेल. त्याबरोबरच, तुम्ही Jioचा पोस्टपेड प्लॅन घेतल्यास, तुम्हाला Netflix, Prime Video आणि Disney + Hotstar इ. चे सबस्क्रिप्शन मिळेल.

Team Digit

Team Digit

Team Digit is made up of some of the most experienced and geekiest technology editors in India! View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo