Airtel 5G: कधी होणार लाँच ? कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध होईल सर्व्हिस ? वाचा सविस्तर…

Updated on 08-Sep-2022
HIGHLIGHTS

Airtel India CEO गोपाल विट्टल यांनी यूजर्सना एक पत्र लिहिले

जाणून घ्या, Airtel 5G संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे

Airtel 5G तुमच्यासाठी सर्वोत्तम का आहे ?

Airtel 5G लाँच करण्याबाबत, Airtel India CEO गोपाल विट्टल यांनी यूजर्सना एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, Airtel 5G सह 4G पेक्षा 20 ते 30 पट जास्त स्पीड असेल. याशिवाय कॉलिंग देखील पूर्वीपेक्षा चांगले होईल. गोपाल विट्टल यांनी 5G शी संबंधित काही प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत.

Airtel 5G तुमच्यासाठी सर्वोत्तम का आहे ?

Airtel 5G नेटवर्क तुमचा स्मार्टफोन लक्षात घेऊन डिझाइन केला गेला आहे. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे Airtel चे 5G भारतात कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करेल. तुम्ही प्रवास करत असाल किंवा एखाद्या ठिकाणी बसून असाल तरीसुद्धा हे काम करत राहील. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत Airtel चे 5G नेटवर्क मिळेल.

हे सुद्धा वाचा : आकर्षक फीचर्ससह Apple Watch Series 8 लाँच, नवीन Airpods देखील लाँच

Airtel 5G मध्ये तुम्हाला काय मिळेल ?

Airtel 5G विशिष्ट गरजांसाठी  डिफरंशियल कॉलिटी करेल, ज्याला 'नेटवर्क स्लाइसिंग' म्हणतात. त्यामुळे जर तुम्ही गेमर असाल आणि तुम्हाला सर्वोत्तम स्पीड हवी असेल, तर आम्ही तुमच्यासाठी नेटवर्कचे स्लाइस करण्यास सक्षम असू. जर तुम्ही घरून काम करत असाल आणि अखंड इंटरनेटचा वापर करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ते तयार करत आहोत.

Airtel 5G कोणत्या फोनमध्ये कार्य करेल ?

एक वर्षापेक्षा जुन्या स्मार्टफोन्सना क्वचितच 5G चिपसेट मिळेल, जरी आता भारतात लॉन्च होणारे बहुतेक नवीन स्मार्टफोन 5G सपोर्ट असलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर त्यात 5G सपोर्ट आहे की नाही ते तपासा. त्यानंतर 5G सेटिंग्ज चालू करा. तुम्हाला 4G किंवा LTE वर 5G निवडण्याचा पर्याय दाखवला जाईल.

Airtel 5G कधी लाँच होणार ?

आम्ही आमची 5G सेवा महिनाभरात सुरू करणार आहोत. डिसेंबरपर्यंत आम्ही मोठ्या महानगरांमध्ये कव्हरेज देऊ. त्यानंतर आम्ही संपूर्ण देश व्यापण्यासाठी वेगाने विस्तार करू. 2023 च्या अखेरीस संपूर्ण शहरी भारत व्यापण्याची आमची अपेक्षा आहे. तुम्हाला तुमच्या शहरात 5G ची उपलब्धता जाणून घ्यायची असल्यास, तुम्हाला  Airtel Thanks ऍपवर ते तपासता येईल. हे फिचर 5G लाँच झाल्यानंतर ऍपवर उपलब्ध होईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :