Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2023 सेल भारतात 8 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फक्त सवलतीच नाही तर, या सेलदरम्यान तुम्ही अनेक ब्रँड्सची नव्याने लाँच केलेले प्रोडक्ट्स अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. Samsung Galaxy Tab A9 सीरीज सेलदरम्यान भारतात लाँच करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये Samsung Galaxy Tab A9 आणि Samsung Galaxy Tab A9+ हे दोन टॅब्लेट भारतात लाँच झाले आहेत.
Samsung Galaxy Tab A9 हे या सिरीजमधील एक परवडणारे मॉडेल आहे, ज्याची विक्री देखील Amazon वर सुरू झाली आहे. Amazon वर A9 Plus मॉडेलची प्री-बुकिंग देखील सुरू झाली आहे, ज्याची विक्री 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल. जास्त वेळ न घालवता टॅबची किमंत आणि फीचर्स जाणून घेऊयात.
Samsung Galaxy Tab A9 सिरीज Amazon India साइटवर सूचीबद्ध केले गेले आहेत. Samsung Galaxy Tab A9 च्या WiFi 4GB + 64GB मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. तर, त्याच्या WiFi + 5G 4GB + 64GB मॉडेलची किंमत Amazon वर 15,999 रुपये इतकी आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबची विक्री Amazon Great Indian Festival 2023 मध्ये सुरू झाली आहे. SBI कार्डद्वारे या टॅबच्या खरेदीवर 5000 रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. येथून खरेदी करा
दुसरीकडे, Samsung Galaxy Tab A9+ च्या WiFi 8GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. तर, त्याच्या WiFi + 5G 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. हे टॅब तुम्ही Amazon वरून प्री-बुक करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, प्री-बुकिंग करणारे ग्राहक SBI कार्डद्वारे हा टॅब 16,999 रुपयांना खरेदी करू शकतात.
Samsung Galaxy Tab A9 मॉडेलमध्ये 8.7-इंच लांबीचा WQXGA LCD डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. तर त्याच्या प्लस मॉडेलमध्ये 11-इंच लांबीचा WQXGA LCD डिस्प्ले दिला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो.
A9 टॅब MediaTek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तर, सिरीजचा प्लस व्हेरिएंट Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
दोन्ही टॅबमध्ये 8MP बॅक कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, A9 मध्ये 2MP कॅमेरा आणि प्लस मॉडेलमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. त्याबरोबरच, कंपनीने दोन्ही टॅबमध्ये 5100mAh बॅटरी दिली आहे. यासह तुमचा टॅब विना चार्ज करता बऱ्याच वेळपर्यंत चालेल.