तुमची मुलं सुद्धा YouTube, Netflix बघतात ? ‘अशा’प्रकारे ऍडल्ट कंटेन्ट ब्लॉक करा

तुमची मुलं सुद्धा YouTube, Netflix बघतात ? ‘अशा’प्रकारे ऍडल्ट कंटेन्ट ब्लॉक करा
HIGHLIGHTS

मुलांनी संवेदनशील कन्टेन्ट बघू नये म्हणून सोप्या टिप्स

पालकही नियंत्रण सेट करून मुलांना संवेदनशील कंटेन्टपासून लांब ठेऊ शकतात.

YouTube आणि Netflixवर पॅरेन्टल कंट्रोल्स सेट करण्याची पद्धत

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये ऑनलाईन क्लासेससाठी लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन देणे आवश्यक झाले होते. मुलांच्या क्लासेस करता पालकांना त्यांच्या हातात नाईलाजाने फोन द्यावे लागले. मात्र, मुलं अभ्यासासोबतच फोनमध्ये इतर मनोरंजक गोष्टीदेखील बघतात. यामुळे आपल्या मुलांनी फोनमध्ये चुकीचा कंटेन्ट बघू नये, यासाठी पालक नेहमीच चिंतेत असतात. कारण, या सर्व गोष्टींमुळे बहुतांश लहान मुलांना देखील फोनचे वेड लागल्याचे चित्र दिसत आहे. Netflix आणि Google सारख्या कंपन्या संवेदनशील कंटेन्ट मुलांपासून दूर ठेवण्यावर काम करत आहे. मात्र, पालकही नियंत्रण सेट करून मुलांना चुकीच्या कंटेन्टपासून लांब ठेऊ शकतात. 

हे सुद्धा वाचा : कॉलिंग आणि अनेक हेल्थ फिचरसह boAt ने आणले जबरदस्त स्मार्टवॉच, किंमत 2,500 रुपयांपेक्षा कमी

YouTube आणि Netflix अशा काही प्लॅटफॉर्ममधून एक आहेत, ज्यावर लहान मुलं सध्या जास्त वेळ घालवताना दिसतात. त्यामुळे जाणून घ्या, युट्युब आणि नेटफ्लिक्सवर नियंत्रण ठेवण्याच्या काही सोप्या टिप्स…

YouTube वर पॅरेंटल कंट्रोल्स सेट करण्याची पद्धत 

– सर्वप्रथम, तुमच्या डिवाइसवर युट्यूब ऍप ओपन करा. 
– आता उजव्या कोपऱ्यातील प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
– सेटिंग्स – जनरल  
– आता, खाली स्क्रोल करा आणि "Restricted Mode" पर्यायावर टॉगल करा. 
 हा मोड वापरकर्त्यासाठी अडल्ट कंटेन्ट प्रतिबंधित करेल. तसेच, हा मोड सेट करणे केवळ त्याच विशिष्ट उपकरणासाठी उपलब्ध असेल.

Netflixवर पॅरेंटल कंट्रोल्स सेट करण्याची पद्धत  

1. तुमच्या Netflix अकाउंटच्या सेटिंग्जमध्ये जा. 
2. ज्या विशिष्ट प्रोफाइलसाठी निर्बंध सेट करायचे आहेत, त्यावर टॅप करा
3. 'Viewing Restrictions' मध्ये जा. 
4. आता वयोगटानुसार स्लाइडर सेट करा
5. "Save" बटणवर टॅप करा. 

तुमच्या मुलांचे अकाउंट ऍडल्ट प्रोफाइल रोखण्यासाठी पिन देखील करता येईल. पुढीलप्रमाणे पिन सेट करा:

Netflix प्रोफाईलवर पासवर्ड सेट करण्याची पद्धत :

– तुमच्या डिवाइसवर नेटफ्लिक्सचे खाते उघडा आणि अकाउंट वर टॅप करा. 
– सेटिंग्समध्ये जाऊन पॅरेन्टल कंट्रोल्सवर जा. 
– नेटफ्लिक्स अकाउंट पासवर्ड टाकून कंटिन्यू करा. 
– नवीन पिन टाका. 
–  पुढील पर्याय निवडा: लहान मुले – सर्व, मोठी मुले 7+, किशोरवयीन 13+ आणि प्रौढ 16+, 18+. 
– प्रक्रिया आटोपल्यावर सेव्ह करा. 
ही प्रक्रिया मुलांना Netflix वर गेम खेळण्यापासून प्रतिबंधित करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी उपयुक्त ठरेल.  

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo