Netflix चा मोठा निर्णय ! मुलांचे चित्रपट आणि शो दरम्यान जाहिराती दाखवणार नाही

Updated on 22-Aug-2022
HIGHLIGHTS

नवीन प्लॅन्ससाठी NETFLIXने घेतला एक मोठा निर्णय

लहान मुलांच्या कंटेंट दरम्यान जाहिराती दाखवणार नाही

भारतात नेटफ्लिक्सला इतर OTT प्लॅटफॉर्म्स कडून स्पर्धा

Netflix ने एक मोठा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सने म्हटले आहे की, ते लहान मुलांचे चित्रपट आणि शो दरम्यान जाहिराती दाखवणार नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, स्ट्रेंजर थिंग्ज, ब्रिजरटन आणि स्क्विड गेम सारख्या मेन शो दरम्यान जाहिराती दिसून येतील, असे देखील सांगण्यात आले आहे. 

हे सुद्धा वाचा : OnePlus चे पहिले स्मार्टवॉच झाले स्वस्त, आरोग्य आणि फिटनेसचे निरीक्षण करण्यासाठी सर्वोत्तम डिवाइस

खरं तर, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि इतर संस्थांनी मागणी केली आहे की, मुलांसाठी जाहिराती कठोर नियमांच्या अधीन आहेत. विश्लेषकांचा असा अंदाज आहे की, Netflix दरवर्षी जाहिरात विक्रीतून $4 अब्ज उत्पन्न करते, ज्यामुळे ते इंटरनेट व्हिडिओ जाहिरातींमध्ये अग्रगण्य खेळाडूंपैकी एक बनेल.

लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कंटेंटबाबत YouTube देखील जागरूक झाले आहे. YouTube मुलांशी संबंधित माहितीचे संकलन मर्यादित करते. याशिवाय यूट्यूब कंटेंटसाठी मुलांच्या पालकांचीही संमती घेतली जात आहे. यूएस फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ने 2019 मध्ये मुलांबद्दल वैयक्तिक माहिती गोळा केल्याबद्दल YouTube ला $170 दशलक्ष दंड ठोठावला होता.

या वर्षी जूनमध्ये नेटफ्लिक्सने सांगितले होते की, ते काही नवीन प्लॅन्स आणणार आहेत ज्यांची किंमत कमी असेल. या प्लॅन्ससह ग्राहकांना जाहिराती दाखवल्या जातील. नेटफ्लिक्सने जाहिरात-आधारित प्लॅन्ससाठी मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली आहे. नेटफ्लिक्सचे जाहिरात मॉडेल 2023 च्या सुरूवातीस नसून या वर्षाच्या अखेरीस सादर केले जाईल अशी अपेक्षा आहे.

Netflix सतत तोटा सहन करत आहे, त्यानंतर कंपनी आता जाहिरात-आधारित योजनेचा विचार करत आहे. भारतीय बाजारपेठेतील नेटफ्लिक्सची पकड कमकुवत होत आहे. भारतात, नेटफ्लिक्सला Amazon Prime Video, Disney Plus Hotstar, Zee5 सारख्या प्लॅटफॉर्मकडून कठीण स्पर्धा मिळत आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :