महत्त्वाचे ! 14 जूनपर्यंत तुमचे Aadhaar Card मोफत करा अपडेट, अन्यथा भरावी लागेल फी…
घरबसल्या मोफतमध्ये Aadhaar कार्ड अपडेट करा.
मोफत सेवा पुढील तीन महिन्यांसाठी उपलब्ध
यासाठी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक
युनिक आयडेंटिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लोकांना आधार अपडेट करण्याची संधी मोफत दिली आहे. जर आधार कार्ड 10 वर्षे जुने असेल तर ते अनिवार्यपणे अपडेट करावे लागेल. तुम्ही अद्याप असे केले नसेल, तर तुम्ही UIDAI च्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या अंतर्गत, ज्या वापरकर्त्यांचे आधार 10 वर्षे जुने आहे ते त्यांची माहिती पूर्णपणे विनामूल्य अपडेट करू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आम्ही आधार अपडेट करण्याची प्रक्रिया मोफत सांगत आहोत.
हे सुद्धा वाचा : JIOच्या 'या' रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार अमर्यादित 5G डेटा, वाचा डिटेल्स
आधार अपडेट कसा करायचा ?
आधार अपडेट करण्यासाठी myAadhaar च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथे तुम्हाला लॉगिन करावे लागेल. यासाठी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वत: अपडेट करताना आधारशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक तुमच्याकडे ठेवा. पोर्टलवर आधार क्रमांक एंटर करा आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून मिळालेला OTP टाकून पुढे जा.
यानंतर, आधार अपडेट विभागात जा आणि वैध आयडेंटिटी सर्टिफिकेट आणि ऍड्रेस प्रुफअपलोड करा. कागदपत्रांची PDF फाइल अपलोड करून पुढे जा. आधार अपडेटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, 14 अंकी अपडेट विनंती क्रमांक जारी केला जाईल. तुम्ही या नंबरसह अपडेट विनंतीचा मागोवा घेऊ शकता.
Keep Demographic Details Updated to Strengthen Your #Aadhaar.
If your Aadhaar had been issued 10 years ago & had never been updated – you may now upload Proof of Identity & Proof of Address documents online at https://t.co/4k2YjTvwMe ‘FREE OF COST’ from 15 March – June 14, 2023. pic.twitter.com/0Lx1LNxZzE— Aadhaar (@UIDAI) March 15, 2023
कधीपर्यंत मिळतेय फ्री ऑफर ?
डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून UIDAI ने हा निर्णय घेतला आहे. वापरकर्ते myAadhaar पोर्टलला भेट देऊन मोफत दस्तऐवज अपडेट करण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ही मोफत सेवा पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजेच 15 मार्च ते 14 जून 2023 पर्यंत उपलब्ध आहे.
तथापि, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, ही सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर मोफत आहे आणि आधार केंद्रावर 50 रुपये शुल्क भरले जाईल, जसे आधीपासून सुरू आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile