केंद्र सरकारने Aadhar तपशील मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख परत एकदा वाढवली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आतापर्यंत ही मुदत उद्या 14 मार्चपर्यंत होती. मात्र, आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी (UIDAI) ने आधार मोफत अपडेट करण्याची तारीख 14 जूनपर्यंत वाढवली आहे. लक्षात घ्या की, Aadhar मंडळाने असेही म्हटले आहे की, ही सेवा 14 जूनपर्यंत फक्त myaadhaar पोर्टलवर उपलब्ध असणार आहे.
हे सुद्धा वाचा: Loksabha Election 2024: Voter ID Card बनवण्यासाठी घरबसल्या Online अप्लाय करा, बघा सोपी प्रक्रिया
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यापूर्वी UIDAI ने सांगितले होते की, “नागरिकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाच्या आधारे, ही सुविधा 15 डिसेंबर 2023 ते 14 मार्च 2024 पर्यंत 3 महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.” त्यानंतर परत एकदा ही सुविधा तीन महिन्यांकरता वाढवली आहे. त्यानुसार, MyAadhaar पोर्टलद्वारे दस्तऐवज अपडेटची सुविधा मोफत सुरू राहील.
खरं तर, UIDAI आधार वापरकर्त्यांना त्यांच्या आयडेंटिटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ (PoI/PoA) दस्तऐवज अपलोड करण्याचे आवाहन करत आहे. जेणेकरुन त्यांचे डेमोग्राफिक डिटेल्स पुन्हा प्रमाणित करता येतील. आधार 10 वर्षांहून अधिक काळापूर्वी जारी केला गेला होता आणि त्यानंतर कधीही अपडेट केला गेला नाही. त्यांच्यासाठी बाब लागू होते.
UIDAI वेबसाइटवरून Aadhar कार्डवरील नाव, पत्ता आणि इ. सारखे वैयक्तिक तपशील विनामूल्य अपडेट केले जाऊ शकतात. मात्र, हे अपडेट्स सामान्य सेवा केंद्रांवर म्हणेजच CSC मध्ये देखील केले जाऊ शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
वरील प्रक्रियेद्वारे तुमचे आधार कार्ड अपडेट करता येईल. लक्षात घ्या की, Aadhar मध्ये केलेल्या या बदलांचा मागोवा घेण्यासाठी तुम्ही ‘अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN)’ वापरू शकता.