आधार कार्डचा गैरवापर होऊ नये, सरकारच्या ‘या’ महत्त्वाच्या टिप्सचे पालन करणे उत्तम
आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकारने दिल्या सिक्युरिटी टिप्स
सर्व 12 अंकी क्रमांक आधार क्रमांक नसतात
फक्त UIDAI च्या वेबसाइटवरून आधार कार्ड डाउनलोड करा
सरकारने आधार कार्डबाबत अत्यंत महत्त्वाच्या सिक्युरिटी टिप्स जारी केल्या आहेत. या टिप्सचे अनुसरण करून, तुम्हाला आधार कार्डद्वारे केलेल्या बनावट आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवता येईल. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये, यासाठी भारत सरकारने काही सिक्युरिटी टिप्स दिल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात महत्त्वाच्या टिप्सबद्दल माहिती…
फक्त UIDAI च्या वेबसाइटवरून आधार कार्ड डाउनलोड करा
आधार कार्ड डाउनलोड करण्याबाबत सतर्क रहा. केवळ UIDAI च्या अधिकृत पोर्टलवरून नेहमी आधार कार्ड डाउनलोड करा. सार्वजनिक संगणक किंवा लॅपटॉपवर आधार कधीही डाउनलोड करा. इंटरनेट कॅफेमधून आधार कार्ड डाउनलोड करणे सक्तीचे असल्यास, प्रिंटआउट घेतल्यानंतर संगणकावरून ई-आधारच्या डाउनलोड केलेल्या सर्व प्रत डिलीट करा.
हे सुद्धा वाचा : Vivo 200W चार्जिंग असलेला स्मार्टफोन घेऊन येत आहे, लवकरच होईल लाँच
आधार प्रमाणीकरण इतिहास सतत तपासत रहा
सरकारने जारी केलेल्या सुरक्षा टिप्समध्ये आधार प्रमाणीकरण सतत तपासणे देखील समाविष्ट आहे. तुम्ही मागील 6 महिन्यांचा 50 प्रमाणीकरण इतिहास तपासू शकता आणि तुम्हाला काही विसंगती आढळल्यास त्वरित कारवाई देखील करू शकता. आधार प्रमाणीकरणात काही तफावत आढळल्यास, 1947 किंवा help@uidai.gov.in वर कळवा. यासोबतच आधार कार्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट असल्याची खात्री करा. आधारचा गैरवापर टाळण्यासाठी आधार ओटीपी कोणाशीही शेअर करू नका.
आधार लॉक/अनलॉक केल्याने डेटा सुरक्षित राहील
UIDAI आधार कार्ड धारकांना त्याचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक्स लॉक अनलॉक करण्याची परवानगी देते. तुम्ही https://resident.uidai.gov.in/aadhaar-lockunlock वर जाऊन आधार कार्ड लॉक-अनलॉक करू शकता. आधार लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी तुम्ही mAadhaar ऍप देखील वापरू शकता. या सेवेसाठी व्हर्च्युअल आयडीचा वापर केला जाईल. तसेच, तुमचे mAadhaar ऍप 4-अंकी पासवर्डसह सुरक्षित करा.
सर्व 12 अंकी क्रमांक आधार क्रमांक नसतात
तसेच आधार कार्ड व्हेरिफाय करणे आवश्यक आहे. तुम्ही आधार कार्ड ऑनलाइन तसेच ऑफलाइन व्हेरिफाय करू शकता. ऑफलाइन व्हेरिफिकेशनसाठी ई-आधार, आधार लेटर किंवा आधार पीव्हीसी कार्डवर दिलेला QR कोड स्कॅन करा. त्याच वेळी, ऑनलाइन व्हेरिफिकेशनसाठी, https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar येथे 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile