Aadhar Card भारत सरकारद्वारे आपल्या नागरिकांना दिला जाणार महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, पत्ता, लिंग, मोबाईल क्रमांक आणि इमेल ID इ. माहिती असते. ही माहिती आपल्याला ऑनलाईन म्हणजेच घरबसल्या अपडेट करता येते. मात्र, व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती जसे की, रेटिना स्कॅन, फिंगरप्रिंट आणि फोटोग्राफ ही माहिती केवळ आधार केंद्रांवर जाऊन अपडेट केले जाऊ शकतात.
खरं तर, आधार कार्डवरील फोटो बऱ्याच लोकांना आवडत नाही. कारण लहानपणीची फोटो आधारवर मोठे होईस्तोवर चालते. ती फोटो आता आपल्याला नको झालेली असते, असे बऱ्याच लोकांसोबत होते. जर तुम्हाला आधार कार्डवरील तुमची फोटो आवडत नाहीये तर ती बदलण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. चला तर मग प्रक्रिया बघुयात –
– सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या वेबसाईटवरून आधार अपडेट फॉर्म डाउनलोड करावे लागेल. किंवा हा फॉर्म कुठल्याही आधार केंद्रावर तुम्हाला सहज मिळून जाईल.
– आता या फॉर्ममध्ये विचारलेला सर्व तपशील भरून घ्या.
– त्यानंतर फॉर्म घेऊन आधार केंद्रावर जा. फिंगरप्रिंट आणि आयरिस कॅप्चरसारखे बायोमेट्रिक डिटेल्स द्या.
– यानंतर तुमची फोटो लाईव्ह कॅप्चर केली जाईल.
– त्यानंतर अपडेट रिक्वेस्ट नंबर रिसीट जनरेट होईल.
– या अपडेटसाठी तुम्हाला 100 रुपयांचा खर्च येणार आहे.
– या अपडेटसाठी किमान 90 दिवसांचा अवधी लागू शकतो.
आधार डेटा अपडेट झाल्यानंतर UIDAI वेबसाइटवरून इ- आधार किंवा आधार कार्डची डिजिटल कॉपी डाउनलोड करता येईल.