How to: अवघ्या 10 मिनिटात घरबसल्या ‘अशा’प्रकारे Online PAN Card साठी अर्ज करा, ते सुद्धा एकदम Free

Updated on 29-Feb-2024
HIGHLIGHTS

PAN Card हे भारतीय नागरिकांसाठी अगदी महत्त्वाचे दस्तऐवज आहे.

e-PAN देखील नियमित PAN Card प्रमाणेच वैध आहे.

फक्त 10 मिनिटांत e-PAN डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

आपणा सर्वांना माहितीच आहे की, PAN Card हे भारतीय नागरिकांसाठी अगदी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जर तुमच्याकडेही Aadhar Card असेल आणि PAN Card नसेल तर, हा लेख केवळ तुमच्यासाठी आहे. तुम्हाला PAN Card साठी अर्ज करायचे आहे, तर काळजी करू नका. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला फक्त 10 मिनिटांत e-PAN कसे बनवायचे ते सांगणार आहोत. ई-पॅन ऑनलाइन बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात सोपी प्रक्रिया-

हे सुद्धा वाचा: Loksabha Election 2024: Voter ID Card बनवण्यासाठी घरबसल्या Online अप्लाय करा, बघा सोपी प्रक्रिया

pan card

e-PAN बनवण्याची सोपी प्रक्रिया

सर्वप्रथम जर तुम्हाला e-PAN बनवायचे असेल, तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. e-PAN देखील नियमित पॅन प्रमाणेच वैध आहे. ई-पॅन कार्ड Aadhar कार्डद्वारेच बनवले जाईल. स्टेप बाय स्टेप सर्व प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

  • तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरून https://www.incometax.gov.in/iec/foportal/ ला भेट द्या.
  • आता खाली दाखवलेल्या instant E-PANच्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये डाव्या बाजूला Get New e-PAN चा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक विचारला जाईल.
  • त्यानंतर, खाली दिलेल्या I confirm that ऑप्शनवर टिक करा. आता तुमच्या Aadhar शी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  • तो OTP सबमिट करा. त्यानंतर, ई-मेल आयडी टाका आणि पॅन कार्डसाठी आवश्यक माहिती भरा.
  • अशाप्रकारे हा फॉर्म भरल्यानंतर लवकरच तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक मिळेल. तुम्ही नियमित पॅन वापरता त्याप्रमाणे तुम्ही हा पॅन नंबर वापरू शकता. वरील सर्व प्रक्रियेसह अर्ज केल्यानंतर ‘Check Status/Download PAN’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही या वेबसाइटवरून PDF स्वरूपात PAN Card डाउनलोड करू शकता.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :