प्रत्येक भारतीय नागरिकाचे महत्त्वाचे दस्तऐवज ‘Aadhaar कार्ड’ होय. आधार युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरं तर, मागील काळात सरकारने 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव, सरकारने Aadhaar कार्ड अपडेट करण्यास सांगितले आहे, जेणेकरून कोणीही तुमच्या आधारचा गैरवापर करू नये.
आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही 14 जूनपूर्वी Aadhaar कार्ड ऑनलाइन अपडेट केले तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या तारखेपूर्वी तुम्ही हे काम अगदी मोफतमध्ये करू शकता. मात्र 14 जूननंतर यासाठी शुल्क आकारले जाईल.
UIDAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करून Aadhaar अपडेटची माहिती दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आधार वापरकर्ते पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकतील. अपडेट करण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा ही दस्तऐवज देखील अपलोड करावे लागतील.
मात्र लक्षात घ्या की, जर आधार कार्ड कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC वरून अपडेट केले, तर तुम्हाला 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. परंतु तुम्ही myAadhaar पोर्टलवरून आधार अपडेट केल्यास ही सेवा पूर्णपणे मोफत असेल.
अशाप्रकारे वरील प्रक्रिया फॉलो करून तुम्ही मोफतमध्ये आधार अपडेटची विनंती करू शकता. यासह तुम्हाला नवा अपडेटेड आधार कार्ड सहज मिळेल.