Aadhaar Card Update: Aadhaar Card धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्यांना आधार कार्डमधील कोणतीही माहिती अपडेट करायची आहे, त्यांच्यासाठी एक मोठे अपडेट पुढे आले आहे. आता, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्डवरील तपशील मोफत अपडेट करण्याची मुदत परत एकदा वाढवली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यापूर्वी या मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2024 होती. त्यामुळे ज्या कार्डधारकांनी अद्याप आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
याद्वारे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI नागरिकांना त्यांच्या आधार कार्डवर नोंदवलेले फरक बदलण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. विशेषत: ज्यांना त्यांचे आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी मिळाले आहे आणि त्यांनी आतापर्यत कोणतेही अपडेट केले नाही. पाहुयात नवी मोफत आधार अपडेटची नवी मुदत-
UIDAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या अधिकृत अकाउंटद्वारे नवे अपडेट दिले आहे. पोस्टनुसार, “UIDAI ने लाखो आधार कार्ड धारकांना लाभ देण्यासाठी मोफत ऑनलाइन दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. UIDAI लोकांना त्यांचे आधार दस्तऐवज अपडेट ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही मोफत सेवा फक्त MyAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे.”
आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही तुमचा पत्ता आणि दस्तऐवज केवळ ऑनलाइन साइटद्वारे मोफत अपडेट करू शकता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, उर्वरित अपडेटसाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. तर, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी आधार धारकाला उपस्थित राहावे लागेल.