Aadhaar Card Update: UIDAI ने परत वाढवली Free आधार कार्ड अपडेटची तारीख, जाणून घ्या नवी मुदत 

Aadhaar Card Update: UIDAI ने परत वाढवली Free आधार कार्ड अपडेटची तारीख, जाणून घ्या नवी मुदत 
HIGHLIGHTS

UIDAI ने वाढवली मोफत आधार कार्ड अपडेटची अंतिम मुदत

तुम्ही येत्या डिसेंबरपर्यंत आधार कार्ड मोफतमध्ये अपडेट करू शकता.

ही मोफत सेवा फक्त MyAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे.

Aadhaar Card Update: Aadhaar Card धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्यांना आधार कार्डमधील कोणतीही माहिती अपडेट करायची आहे, त्यांच्यासाठी एक मोठे अपडेट पुढे आले आहे. आता, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्डवरील तपशील मोफत अपडेट करण्याची मुदत परत एकदा वाढवली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यापूर्वी या मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2024 होती. त्यामुळे ज्या कार्डधारकांनी अद्याप आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Also Read: Jio Diwali Dhamaka Offer: दिवाळीनिमित्त युजर्सना खास भेट! तब्बल 1 वर्षासाठी JioAirfiber कनेक्शन मिळेल Free

aadhaar card online
aadhaar card online

याद्वारे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI नागरिकांना त्यांच्या आधार कार्डवर नोंदवलेले फरक बदलण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. विशेषत: ज्यांना त्यांचे आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी मिळाले आहे आणि त्यांनी आतापर्यत कोणतेही अपडेट केले नाही. पाहुयात नवी मोफत आधार अपडेटची नवी मुदत-

मोफत आधार कार्ड अपडेटची नवी मुदत

UIDAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या अधिकृत अकाउंटद्वारे नवे अपडेट दिले आहे. पोस्टनुसार, “UIDAI ने लाखो आधार कार्ड धारकांना लाभ देण्यासाठी मोफत ऑनलाइन दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. UIDAI लोकांना त्यांचे आधार दस्तऐवज अपडेट ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही मोफत सेवा फक्त MyAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे.”

आधार कार्ड अपडेट

आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही तुमचा पत्ता आणि दस्तऐवज केवळ ऑनलाइन साइटद्वारे मोफत अपडेट करू शकता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, उर्वरित अपडेटसाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. तर, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी आधार धारकाला उपस्थित राहावे लागेल.

आधार कार्डवर अपडेट करण्याची प्रक्रिया

  • सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in/en वर जावे लागेल.
  • येथे तुम्हाला ‘अपडेट आधार’चा पर्याय मिळेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला येथे 12 अंकी आधार क्रमांक भरावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल.
  • हा OTP टाकून तुम्हाला लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करा.
  • यानंतर खाली स्क्रोल करा. जिथे तुम्हाला तुमच्या ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आणि पत्ता पुरावा अपडेट करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल. अशाप्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होईल.
  • यानंतर, तुम्हाला एक विनंती क्रमांक मिळेल ज्याद्वारे तुम्ही तुमचे आधार अपडेट झाले आहे की नाही हे तपासण्यास सक्षम असाल.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo