आधार कार्ड मध्ये बदल करण्यासाठी आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील, पण तुम्हाला सांगू इच्छितो कि हे बदल जर तुम्हाला ऑफलाइन करायचे असतील तर तुम्हाला यासाठी पैसा द्यावे लागतील. UIDAI ने आपल्या नियमांत पुन्हा एकदा काही बदल केले आहेत, ज्यामुळे अशी बाटी समोर आली आहे.
भारतात वेळोवेळी UIDAI च्या नियमांमध्ये बदल होत असतात. पुन्हा एकदा नियमांमध्ये मध्ये काही बदल झाले आहेत. जर तुम्ही आता आपल्या आधार कार्ड मध्ये ऑफलाइन माध्यमातून कोणत्याही प्रकारचा एखादा बदल करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला आता जास्त पैसे खर्च करावे लागतील. अर्थात् आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारच्या संपादनासाठी आता तुम्हाला जास्त शुल्क द्यावे लागेल. हा नियम 1 जानेवारी 2019 पासून लागू झाला आहे. हा नवीन नियम लागू होताच आता तुम्हाला आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी ऑफलाइन माध्यमातून तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे संपादन आता महाग झाले आहे.
आधार कार्ड मध्ये बदल करण्यासाठी किती शुल्क द्यावे लागेल
वर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आता ऑफलाइन माध्यमातून तुमच्या आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केल्यास तुम्हाला 1 जानेवारी 2019 नंतर जास्त पैसे खर्च करावे लागतील. जर बदलेल्या शुल्क पाहता तुम्हाला कोणत्ययी प्रकारच्या बायोमेट्रिक अपडेट साठी आता Rs 100 द्यावे लागतील. तसेच तुम्ही कोणताही डेमोग्राफिक बदल तुमच्या आधार कार्ड मध्ये केला तर तुम्हाला यासाठी जवळपास Rs 50 एवढे शुल्क दयावे लागेल.
झालेल्या बदलांबद्दल पुढे बोलायचे झाल्यास तुम्हाला ई-केवाईसी किंवा एका पानावर प्रिंट आउट घेण्यासाठी जवळपास Rs 30 द्यावे लागतील. पण जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमचे नाव बदलायचे असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्हाला Rs 50 द्यावे लागतील. विशेष म्हणजे हे शुल्क आधी जवळपास Rs 25 होते.