आपण सर्वांनाच माहिती आहे की, टेलिकॉम दिग्गज आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा विवाह सोहळा नुकतेच पार पडला. या विवाह सोहळ्याच्या उत्साहात रिलायन्स Jio कडून तीन महिन्यांच्या मोफत रिचार्जचे आश्वासन देणारा एक ‘स्कॅम मॅसेज’ WhatsApp वर फिरत आहे, जो वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हिंदीत लिहिलेल्या या मेसेजमध्ये मुकेश अंबानी मुलाच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी फ्री रिचार्ज देत असल्याचा दावा केला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती-
WhatsApp वर येणाऱ्या स्कॅम मेसेजमध्ये असे लिहले आहे की, “12 जुलै रोजी अनंत अंबानींच्या लग्नानिमित्त मुकेश अंबानी जी संपूर्ण भारताला 3 महिन्यांच्या वैधतेसह येणारे 799 रुपयांचे मोफत रिचार्ज देत आहेत. यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंकवर क्लिक करून तुमचा नंबर रिचार्ज करा.” क्लिक केल्यानंतर ‘MahaCashback’ नावाच्या संशयास्पद वेबसाइटची लिंक असते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, रिलायन्स Jio ने अशा कोणत्याही ऑफरबद्दल अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. तसेच, या मॅसेजमध्ये असणाऱ्या व्याकरणातील चुका हे सुद्धा फसवणुकीचे मॅसेज असल्याचे दर्शविते.
काही रेड फ्लॅग्स स्कॅमचे स्वरूप प्रकट करतात. त्याचप्रमाणे, ज्या मॅसेजेसमध्ये ‘ब्लू लिंक्सवर क्लिक’ करण्यास सांगितले जाते. किंवा एखादी अनधिकृत वेबसाइट लिंक्स समाविष्ट केली जाते, अशाप्रकारे मॅसेज असल्यास हे संशयास्पद असतात.