Jio ची नवी ऑफर? मुलाच्या लग्नानिमित्त मुकेश अंबानी 3 महिन्यांचे रिचार्ज देत आहेत Free? पहा डिटेल्स
Jio कडून तीन महिन्यांच्या मोफत रिचार्जचे आश्वासन देणारा एक 'स्कॅम मॅसेज' WhatsApp वर फिरत आहे.
स्कॅममध्ये 'MahaCashback' नावाच्या संशयास्पद वेबसाइटची लिंक असते.
रिलायन्स Jio ने अशा कोणत्याही ऑफरबद्दल अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.
आपण सर्वांनाच माहिती आहे की, टेलिकॉम दिग्गज आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा विवाह सोहळा नुकतेच पार पडला. या विवाह सोहळ्याच्या उत्साहात रिलायन्स Jio कडून तीन महिन्यांच्या मोफत रिचार्जचे आश्वासन देणारा एक ‘स्कॅम मॅसेज’ WhatsApp वर फिरत आहे, जो वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हिंदीत लिहिलेल्या या मेसेजमध्ये मुकेश अंबानी मुलाच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी फ्री रिचार्ज देत असल्याचा दावा केला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती-
WhatsApp Scam Message
WhatsApp वर येणाऱ्या स्कॅम मेसेजमध्ये असे लिहले आहे की, “12 जुलै रोजी अनंत अंबानींच्या लग्नानिमित्त मुकेश अंबानी जी संपूर्ण भारताला 3 महिन्यांच्या वैधतेसह येणारे 799 रुपयांचे मोफत रिचार्ज देत आहेत. यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंकवर क्लिक करून तुमचा नंबर रिचार्ज करा.” क्लिक केल्यानंतर ‘MahaCashback’ नावाच्या संशयास्पद वेबसाइटची लिंक असते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, रिलायन्स Jio ने अशा कोणत्याही ऑफरबद्दल अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. तसेच, या मॅसेजमध्ये असणाऱ्या व्याकरणातील चुका हे सुद्धा फसवणुकीचे मॅसेज असल्याचे दर्शविते.
अशा प्रकारचे फसवणुकीचे मॅसेजेस कसे ओळखणार?
काही रेड फ्लॅग्स स्कॅमचे स्वरूप प्रकट करतात. त्याचप्रमाणे, ज्या मॅसेजेसमध्ये ‘ब्लू लिंक्सवर क्लिक’ करण्यास सांगितले जाते. किंवा एखादी अनधिकृत वेबसाइट लिंक्स समाविष्ट केली जाते, अशाप्रकारे मॅसेज असल्यास हे संशयास्पद असतात.
अशा प्रकारच्या स्कॅम मॅसेजेसपासून स्वतःचा बचाव कसे कराल?
- फक्त अधिकृत चॅनेलद्वारे रिचार्ज करा: फोनवर रिचार्ज करण्यासाठी Jio अधिकृत साईट, MyJio ॲप किंवा Google Pay सारखे विश्वसनीय ऑनलाइन पेमेंट ॲप्स वापर करा.
- अनोळखी मॅसेजपासून सावध: कोणत्याही अनोळखी मॅसेजवर विश्वास ठेवू नका, जे मोफत सर्व्हिस किंवा डील्सचे आश्वासन देतात. अशा मॅसेजेसमधील कोणत्याही लिंकवर चुकूनही क्लिक करू नका.
- अधिकृत स्त्रोतांकडून ऑफर व्हेरिफाय करा: जेव्हाही तुम्हाला एखादी आकर्षक ऑफर मिळते. तेव्हा नेहमी प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा कंपनीच्या ग्राहक सर्व्हिससह संपर्क साधून माहिती मिळवा.
- तक्रार करा: संशयास्पद संदेश ओळखणे आणि इतरांना सुरक्षित ठेवणे सोपे करण्यासाठी WhatsApp चे रिपोर्टिंग फिचर वापरा.
- तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका: तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती कधीही अनपेक्षित मॅसेजेसमध्ये मिळालेल्या लिंकद्वारे शेअर करू नका.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile