Chughtai यांचा जन्म 21 ऑगस्ट 1915 ला बदायूं, उत्तर प्रदेश मध्ये झाला होता आणि 1976 मध्ये त्यांना पद्माश्री ने सम्मानित करण्यात आले होते.
आज गूगल ने डूडल च्या माध्यमातून फाळणीच्या काळात प्रसिद्ध असलेल्या लेखिका Ismat Chughtai यांना त्यांच्या 107व्या जन्मदिनानिमित्त सम्मानित केले आहे. Chughtai सादत हसन मंटो यांसारख्या इतर प्रगतिशील लेखकां सोबत, सामाजिक-सांस्कृतिक प्रस्तापित विचारांच्या विरोधात मानवी संघर्षाच्या भावनात्मक लिखाणासाठी ओळखल्या जातात.
Chughtai यांचा जन्म 21 ऑगस्ट 1915 ला बदायूं, उत्तर प्रदेश मध्ये झाला होता आणि 1976 मध्ये त्यांना पद्माश्री ने सम्मानित करण्यात आले होते. Chughtai फाळणीच्या काळात साहित्यिक आंदोलनात सहभागी असलेल्या प्रोग्रेसिव राइटर एसोसिएशन च्या सर्वात उल्लेखनीय लोकांपैकी एक होत्या.
Chughtai यांची सर्वात प्रसिद्ध लघु कथा लिहाफ होती. कथेत समाजातील महिला पुरुष समानता आणि त्यातील संवेदनशील मुद्दे दाखवण्यात आले आहेत. 1996 मध्ये आलेल्या दीपा मेहता यांची फिल्म, फायर मध्ये लिहाफ चे मोठ्या पडद्यावर रुपांतरण दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या प्रमुख भूमिका होत्या.