लवकरच प्रेक्षकांना 'Pushpa 2' ची झलक थिएटरमध्ये दिसणार
वृत्तानुसार, डिसेंबरमध्ये रिलीज होणार्या अवतार 2 चित्रपटासोबत ही झलक दाखवली जाणार
'पुष्पा द राइज'ने हिंदी भाषेत 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द रुल'ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने अल्लू अर्जुनला संपूर्ण भारताचे स्टार बनवले. साऊथ सोबतच हिंदी पट्ट्यातील लोकांचीही या चित्रपटाने मने जिंकली आहेत. दरम्यान, आता पुष्पा 2 चित्रपटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची झलक पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
शनिवारपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की, चित्रपटाचे निर्माते पुष्पा 2 साठी खास प्लॅनवर काम करत आहेत. वृत्तानुसार, डिसेंबरमध्ये रिलीज होणार्या अवतार 2 चित्रपटासोबत पुष्पा 2 च्या शूटिंगची घोषणा करणारा व्हीडिओ अटॅच करण्याची तयारी सुरू आहे. या व्हिडिओमध्ये अल्लू पुन्हा एकदा पुष्पाच्या अवतारात आपला जलवा दाखवणार आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
'पुष्पा द राइज'ने केली होती जोरदार कमाई
नुकतेच या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफरने देखील या चित्रपटाचे मोठे अपडेट दिले आहेत. अल्लूसोबतचा फोटो शेअर करत त्याने लिहिले, 'और एडवेंचर शुरू होता है।' विशेष म्हणजे, पुष्पा द राइजने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने हिंदी भाषेत 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.