ह्याच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर हा ९.७ इंचाचा हा आयपॅड प्रोच्या 32GB वेरिएंटची किंमत ५९९ डॉलर आहे. तर ह्याच्या 128GB वेरिएंटची किमत 749 डॉलर आहे आणि 256GB वेरिएंटची किंमत ८९९ डॉलर आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अॅप्पलने बाजारात आपला नवीन टॅबलेट आयपॅड प्रो लाँच केला. ह्या टॅबलेटचे जास्तकरुन बरेच स्पेसिफिकेशन आयपॅड प्रो चेच आहेत. तथापि, हा 9.7 इंचाच्या फॉर्म फॅक्टरमध्ये येईल. हा नवीन टॅबलेटमध्ये डिटेचेबल स्मार्ट कीबोर्डसाठी स्मार्ट कनेक्टरसुद्धा मिळतो आणि त्याचबरोबर ह्यात अॅप्पल पेन्सिलसुद्धा देण्यात आली आहे.
हा नवीन टॅबलेट ४ प्रकारात येतो, ज्यात रोझ गोल्डचा सुद्धा समावेश आहे. ह्याच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर हा ९.७ इंचाचा हा आयपॅड प्रोच्या 32GB वेरिएंटची किंमत ५९९ डॉलर आहे. तर ह्याच्या 128GB वेरिएंटची किमत 749 डॉलर आहे आणि 256GB वेरिएंटची किंमत ८९९ डॉलर आहे.
ह्या नवीन टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 9.7 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2048×1536 पिक्सेल आहे. हा डिवाइस A9X प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.
त्याचबरोबर ह्यात 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे.