मुंबईच्या उपनगरीय रेल्वे यात्रेकरुंना आता आणखी ७ रेल्वे स्टेशन्सवर मोफत वायफाय मिळणार आहे. ही सेवा चर्चगेट, दादर, ब्रांदा, ब्रांदा टर्मिनस, खार, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण स्टेशन्सवर सुरु होणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, यूजर्सला OTP नंबर मिळाल्यानंतर ही सेवा सुरु करण्यासाठी आपला मोबाईल नंबर रजिस्ट्रर करावा लागेल. त्यानंतर आपल्याला लॉग इन पेजवर जाऊन लॉग इन करुन ह्या सेवेचा आनंद घेऊ शकता. मात्र रिपोर्टनुसार, पहिल्या ३० मिनिटांसाठी ह्याचा स्पीड खूपच उत्कृष्ट असेल, त्यानंतर हळू-हळू हा स्पीड कमी होईल.
हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर फ्री-वायफाय सेवा सुरु करण्यासाठी गुगल आणि रेलटेलने भागीदारी केली आहे आणि ह्या वर्षाच्या शेवटी आणखी १०० स्टेशनांवर ही सेवा सुरु करण्याची योजना आहे. इतर स्टेशनांवर जसे की, भुवनेश्वर, उज्जैन, जयपूर, गुवाहाटी आणि अन्य शहरांमध्ये आधीपासूनच गुगलची मोफत वायफाय सेवा सुरु आहे.
फेसबुकसुद्धा भारतात वायफाय सेवा सुरु करण्याची योजना बनवत आहे, ज्याचे नाव Express Wi-Fi. मात्र ही सेवा मोफत मिळणार नाही, मात्र ह्याची किंमत थोडी स्वस्त असेल. त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले आहे की, “ग्रामीण ISP पार्टनर्ससह” मिळून ते ग्रामीण भागातसुद्धा वायफाय हॉटस्पॉट सेवा सुरु करणार आहेत. परंतू सध्यातरी फेसबुक ह्यावर काम करत आहे.
https://twitter.com/WesternRly/status/767631343681429504
हेदेखील वाचा – BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी केली मोफत अनलिमिटेड कॉलिंगची घोषणा
हेदेखील वाचा – सॅमसंगने भारतात लाँच केला गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन, किंमत ५९,९९० रुपये