दोन वर्षांच्या चाचणीनंतर भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू झाला आहे. रिलायन्स JIO, VI आणि AIRTEL यांनी 5G चाचणी दरम्यान भाग घेतला होता. परंतु आता आणखी एक नवीन कंपनी अदानी समूह शेवटच्या लिलावात सामील झाली आहे.
5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी असलेल्या अदानी समूहाच्या कंपनीचे नाव अदानी डेटा नेटवर्क आहे. काही अहवाल असा दावा करत आहेत की, ऑक्टोबर 2022 पर्यंत देशात 5G नेटवर्कचा व्यावसायिक वापर सुरू होईल. मात्र या प्लॅन्सची किंमत किती असेल, हे अद्याप गुपित आहे. लाँचपूर्वी, दूरसंचार विभागाने अशा 13 शहरांची यादी जारी केली, जिथे 5G प्रथम लाँच होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या शहरांची नावे…
हे सुद्धा वाचा : Vivo चा उत्तम एंट्री लेव्हल फोन लवकरच होणार लाँच, आकर्षक लुकसह मिळतील जबरदस्त फीचर्स
1.बंगलोर 2. दिल्ली 3. हैदराबाद 4. गुरुग्राम 5. लखनौ 6. पुणे 7. चेन्नई 8. कोलकाता 9. गांधीनगर 10. जामनगर 11. मुंबई 12. अहमदाबाद 13. चंदीगड
दिल्ली, मुंबई, पुणे आणि गुरुग्राम सारख्या अनेक शहरांमध्ये खाजगी कंपन्या 5G ची टेस्टिंग करत असल्या तरी ट्रायने भोपाळमध्ये प्रथमच 5G ची टेस्टिंग केली आहे. वापरकर्त्यांना 5G कनेक्टिव्हिटी देण्यासाठी दूरसंचार सेवा प्रदात्याद्वारे (TSP) शहरातील पायाभूत सुविधा कशा वापरल्या जाऊ शकतात, हे शोधण्यासाठी ही टेस्टिंग केली जात आहे. भोपाळमध्ये 5G पायाभूत सुविधांसाठी ट्रॅफिक सिग्नल पोल, स्ट्रीट लाईट पोल, स्मार्ट पोल, डायरेक्शन बोर्ड, होर्डिंग्ज, फूट ओव्हर ब्रिज आणि सिटी बस शेल्टर यांसारखे स्ट्रीट फर्निचर वापरले गेले.