तुम्ही 5G सेवा सुरू होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता लवकरच हाय स्पीड डेटाचा आस्वाद घेऊ शकता. केंद्राने गुरुवारी सांगितले की, 5G सेवा भारतात 12 ऑक्टोबरपर्यंत आणल्या जातील. पुढील काही वर्षांत देशाच्या प्रत्येक भागात सेवा उपलब्ध करून देणे आणि त्या स्वस्त ठेवण्याचे लक्ष्य आहे.
हे सुद्धा वाचा : 8000mAh बॅटरीसह TCL चा नवीन 5G टॅब लाँच, चार्ज न करताही चालेल तासन्तास
याबाबत केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "आम्ही 5G सेवा लवकर सुरू करण्याची योजना आखत आहोत. दूरसंचार ऑपरेटर त्या संदर्भात काम करत आहेत आणि इंस्टॉलेशन केली जात आहेत. आम्हाला आशा आहे की, 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू होईल."
वैष्णव पुढे म्हणाले की, "आम्ही 5G पुढील दोन ते तीन वर्षांत देशाच्या प्रत्येक भागात पोहोचेल अशी अपेक्षा करतो. आम्ही ते परवडणारे राहील याची खात्री करू. उद्योग शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांवर लक्ष केंद्रित करत आहोत."
अहवालानुसार, सेवा टप्प्याटप्प्याने आणल्या जातील आणि पहिल्या टप्प्यात फक्त 13 निवडक शहरांना हाय स्पीड 5G इंटरनेट सेवा मिळेल. या शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे. मात्र, नमूद केलेल्या या शहरांतील प्रत्येक नागरिकाला 5G सेवा मिळू शकत नाही.
आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतात लवकरात लवकर 5G लाँच केले जाईल आणि त्याची गती 4G नेटवर्कपेक्षा 10 पट जास्त असेल.