5G चे कमर्शियल लॉन्चिंग जाहीर करण्यात आले आहे. Airtel, Jio आणि Vodafone Idea देशात कधीही 5G लाँच करू शकतात. एअरटेल आणि जिओने सांगितले आहे की, त्यांची 5G सेवा ऑगस्ट महिन्यातच सुरू होईल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक बैठकीत या महिन्याच्या शेवटी Jio चे 5G लाँच केले जाण्याची शक्यता आहे.
त्याबरोबरच असेही बोलले जात आहे की, सरकार 29 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) मध्ये 5G लाँच करण्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 5G अपेक्षेपेक्षा लवकर लाँच केले जाईल, असे सांगितले आहे.
हे सुद्धा वाचा : SAMSUNG चा हा फोन 3,000 रुपयांनी स्वस्त झाला, पाण्यात सुद्धा खराब होत नाही
अनेक रिपोर्ट्सनुसार, 5G लाँच देशभरात एकाच वेळी होणार नाही आणि त्याचे कव्हरेज 4G इतक विस्तृत नसेल. 5G वेगवेगळ्या टप्प्यात लाँच केले जाईल. पहिल्या टप्प्यासाठी, 13 शहरांची निवड करण्यात आली आहे जिथे 5G प्रथम लाँच केले जाईल. चला बघुयात यादी…
अहमदाबाद, बंगलोर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई,
पुणे.
या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सर्वप्रथम 5G अनुभवण्याची संधी मिळेल. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही कंपनीने काही स्पष्ट सांगितले नाही. गेल्या आठवड्यात दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, सर्व दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रमशी संबंधित पत्रे देण्यात आली आहेत.