AIRTELचे चेअरमन सुनील मित्तल यांनी शेवटी भारतात 5G सेवा सुरू केली आहे आणि घोषित केले आहे की, दूरसंचार ऑपरेटर आजपासून निवडक शहरांमध्ये 5G सुरू करेल. सुनील मित्तल यांनी यावर जोर दिला की, AIRTELने भारतभर 5G सेवा लवकरात लवकर पसरवण्याची योजना देखील आखली आहे. लेटेस्ट नेटवर्क प्रथम सुमारे 8 शहरांमध्ये उपलब्ध होईल.
हे सुद्धा वाचा : SAMSUNG चा 'फोल्डिंग फोन Galaxy Z Flip 4 नवीन कलरमध्ये, मिळतेय कॅशबॅक ऑफर
जरी सर्व 8 शहरांची नावे उघड केली नसली तरी मित्तल यांनी पुष्टी केली की, दिल्ली, वाराणसी, मुंबई, बंगलोर आणि इतर चार शहरे Airtel 5G सेवा सुरू करतील. मार्च 2024 पर्यंत दूरसंचार कंपनी भारताच्या कानाकोपऱ्यात 5G सेवा सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
रिलायन्स JIO ने 5G रोलआउटची नेमकी लाँच डेट उघड केलेली नाही. परंतु, RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, भारतात 5G सेवा वितरीत करण्यास थोडा उशीर झाला असला तरी, दूरसंचार कंपनीने डिसेंबर 2023 पर्यंत भारताच्या प्रत्येक भागात 5G टेक्नॉलॉजी ऑफर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचा अर्थ असा की, JIOने आधीच प्रत्येकाला 5G सेवा देण्याचे ध्येय ठेवले आहे. मात्र, AIRTEL ने काही शहरांमध्ये 5G सेवा देणे सुरू केले आहे.
अंबानींनी हे देखील जाहीर केले आहे की, Jio 5G प्लॅन वापरकर्त्यांना जगातील सर्वात कमी किमतीत देण्यात येणार आहेत. रिलायन्स JIO ने यापूर्वी घोषणा केली होती की, ते दिवाळीपर्यंत 5G चे रोलआउट सुरू करेल, त्यामुळे येत्या आठवड्यात ते अपेक्षित आहे. Vodafone Idea ने देखील लवकरच भारतात नवीनतम नेटवर्क आणण्यास सुरुवात करण्याचे आश्वासन दिले आहे.