ट्रेन किंवा बसने प्रवास करत असताना, काही लोक मोठ्या आवाजात गाणी ऐकतात किंवा व्हीडिओ बघतात, अशा परिस्थितीत याचा इतरांना त्रास होत असतो. असाच काही लोकांसाठी मोबाईल वापराबाबत नवा नियम आला आहे. ज्यामध्ये तुम्ही बसमध्ये प्रवास करताना फोनवर मोठ्याने बोललात किंवा हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला एकूण 5000 रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच, 3 महिन्यांची शिक्षा होण्याची देखील शक्यता आहे.
का आला नवा नियम ?
वृत्तानुसार, मोबाइल फोनबाबत नवा नियम आणण्याच्या मागे ध्वनी प्रदूषण हे कारण आहे. साउंड डेसिबल लेव्हल कमी ठेवण्यासाठी नवा नियम जारी करण्यात आला आहे. यासोबतच बस प्रवाशांना गैरसोयीपासून वाचण्यासाठी नवा नियम आवश्यक आहे. त्यामुळे, कोणत्याही बस प्रवाशाला फोनवर मोठ्याने बोलू दिले जाणार नाही. त्याबरोबरच, जर गाणी किंवा व्हीडिओ ऐकायचे आहेत, तर त्यांनी हेडफोन लावणे गरजेचे आहे.
सध्या मुंबईत नवा नियम लागू
सध्या बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने बसमध्ये हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहण्यासाठी जेलबाबत नवीन नियम जारी केला आहे. यासंदर्भातील अधिसूचना 25 एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती.
बेस्टने या आठवड्यापासून मोबाईल फोनच्या स्पीकरवर व्हिडिओ पाहण्यास किंवा गाणी वाजवण्यास बंदी घातली आहे. हा नवा नियम मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील बस प्रवाशांना लागू होणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.