तुमचा मोबाईल डाटा वाचविण्यासाठी ४ सोप्या कृती

तुमचा मोबाईल डाटा वाचविण्यासाठी ४ सोप्या कृती
HIGHLIGHTS

इंटरनेट डाटा पॅक वाचवण्यासाठी आम्ही पुढे दिलेल्या ४ सोप्या कृती केल्या तर तुमचा डाटा पॅक वाचलाच म्हणून समज. असे केल्यास आपला मोबाईल डाटा जास्त दिवस चालेल आणि तुमच्या खिशाला चापसुद्धा बसणार नाही.

सध्याच्या फास्ट लाइफमध्ये अनेकजण असे पाहायला मिळतात, ज्यांचे मोबाईल इंटरनेटशिवाय कामच होत नाही. मात्र डाटा प्लानचे रिचार्ज केल्यानंतर काही दिवसातच आपल्याला मेसेज येणे सुरु होते, की आपला इंटरनेट पॅक संपणार आहे. वाढणा-या किंमती आणि डाटा यूज जास्त झाल्यामुळे आपण इंटरनेट वापरणे बंद तर करु शकणार नाही, मात्र काही सोप्या पद्धतीने डाटा खर्च होण्यापासून वाचवू नक्की शकतो. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत ह्या पद्धती…

१. इंटरनेट ब्राउझर डाटा कॉम्प्रेशनचा प्रयोग करा

क्रोम (Chrome) ब्राउजरमध्ये एक सेटिंगला चालू केल्यानंतर हा ब्राउझर आपल्या मोबाईल इंटरनेट डाटाला कॉम्प्रेस करतो. ज्याने आपल्या ब्राउझरचा इंटरनेट डाटा ५० टक्क्यांपेक्षा कमी होतो. त्यासाठी क्रोममध्ये आपल्या उजव्या बाजूला सेटिंगमध्ये जाऊन डाटा सेवरवर क्लिक करा. त्यात तो ऑप्शन चालू करा. असे केल्यास आपला इंटरनेट कमी खर्च होईल.

. Auto Sync आणि बॅक ग्राउंड डाटा बंद करा
फोनचे अनेक अॅप्लीकेशन फोनचा प्रयोग न होता ही ई-मेल, फोटो आणि इतर डाटा डाऊनलोड करतात. मोबाईल डाटाची बचत करण्यासाठी आपण सेटिंगमध्ये जाऊन “Auto-sync Data” बंद करा आणि “Restrict background data” चालू करा. ह्याने तुमचा इंटरनेट पॅक वाचेल.

३. गुगल मॅप ऑफलाइन वापरा
जर आपण गुगल मॅपचा वापर करत असाल, तर बराच मोबाईल डाटा खर्च होता. मात्र जर आपण गुगल मॅपला ऑफलाइन  म्हणजेच इंटरनेटशिवाय वापरत असाल, तर बराच मोबाईल डाटा खर्च होऊ शकतो. ह्यासाठी “गुगल मॅप”च्या सेटिंगमध्ये जाऊन मॅप एरिया निवडा आणि त्याला ऑफलाइन करुन तो सेव्ह करा.

४. आपल्या आवडीचे गाणे किंवा व्हिडियो ऑफलाइन करुन पाहा.
जर तुम्ही कोणते गाणे किंवा व्हिडियो किंवा चित्रपट पाहू इच्छिता, तर आपल्याला त्याला ऑफलाइन पाहावे लागेल. कारण ऑनलाइन पाहिल्यास तुमचा इंटरनेट पॅक लवकर संपतो.

हेदेखील वाचा – मोटो Z, मोटो Z फोर्स स्मार्टफोन्स सप्टेंबरमध्ये होणार भारतात लाँच?
हेदेखील वाचा – शाओमीने लाँच केली एक इलेक्ट्रिक फोल्डिंग सायकल

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo