अखेर चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर मोठ्या पडद्यावर चित्रपट सिनेरसिकांसाठी खूप मोठ्या समाधानाची बाब आहे. असे म्हणता येईल की, मोठ्या पडद्यावर हाय ऑक्टेव्ह मनोरंजन पाहण्याची मागणी देखील आता वाढू लागली आहे. देशभरात आगामी चित्रपटांची लाइनअप मोठी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला 300 कोटींपेक्षा जास्त बजेटमध्ये तयार करण्यात येत असलेले आगामी टॉप 5 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. चला तर बघुयात आगामी बिग बजेट चित्रपटांची यादी…
हे सुद्धा वाचा : अप्रतिम ऑफर ! iPhone 13 वर मिळतेय 12,400 रुपयांची सूट, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध
या चित्रपटातून बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान पुनरागमन करत आहे. आगामी चित्रपटाचे बजेट 250-300 कोटींच्या आसपास आहे. हाय व्होल्टेज ऍक्शन ड्रामामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमुळे शाहरुखच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. परंतु चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांना जानेवारी 2023 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हा चित्रपट चोल साम्राज्यावर तयार केला जातोय. जो भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महान ऐतिहासिक काल्पनिक चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ शकतो. टीझरने सर्वांनाच प्रभावित केले असून हा चित्रपट 500 कोटींहून अधिक बजेटमध्ये बनला आहे.
दिग्दर्शक अली अब्बास जफर या फास्ट -अॅक्शन चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि खिलाडी अभिनेता अक्षय कुमार यांची 'जोडी' एकत्र आणण्याच्या तयारीत आहेत. रिलीज सध्या स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, चित्रपट 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेटमध्ये बनवला जात आहे. या चित्रपटाचा निर्मिती खर्च सुमारे 120 कोटी रुपये आहे.
शिवाच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर आणि ईशाच्या भूमिकेत अभिनेत्री आलिया भट्ट असलेला बहुप्रतिक्षित 'एस्ट्राव्हर्स' अखेर या सप्टेंबरमध्ये रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत VFX वापरण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणेल, असा अंदाज आहे. 300 कोटींहून अधिक बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिलीज म्हणून ओळखला जातो.
जिथे साऊथचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास असेल तिथे सगळेच भव्यदिव्य होणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याच्यासोबत, बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 500 कोटींच्या जबरदस्त बजेटमध्ये बनवला जात आहे.