गेल्या वर्षी 95 हजारांहून अधिक UPI फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.
QR कोडद्वारे फ्रॉड लोक जनतेची फसवणूक करतात.
ऑनलाईन पेमेंट करण्याआधी खालील बाबींची काळजी घ्या.
भारतात डिजिटल व्यवहारांचा कल वाढतच चालला आहे. आता क्वचितच लोक आहेत, जे त्यांच्या खिशात कॅश ठेवत असतील. खरं तर, यामुळे आयुष्य जरा सोपे झाले वाटत असेल तरी दुसरीकडे अशा काही चुका आहेत ज्या क्षणार्धात तुमचे कष्टाचे पैसे उडवू शकतात. एका सरकारी डेटानुसार गेल्या वर्षी 95 हजारांहून अधिक UPI फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.
UPI पेमेंट करताना अशा काही बाबी आहेत, ज्याबद्दल तुम्हाला नेहमीच काळजी घेतली पाहिजे. या लेखात आम्ही तुम्हाला याच महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत.
UPI व्यवहारांसाठी पब्लिक Wi-Fi चा वापर
तुम्ही देखील कधी UPI व्यवहार करत असाल तर ओपन Wi-Fi मध्ये अडकण्याची चूक होणार नाही, याची विशेष काळजी घ्या. UPI व्यवहार करण्यासाठी फक्त सुरक्षित Wi-Fi कनेक्शन किंवा मोबाइल डेटाचा वापर करा.
अज्ञात लिंक
तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून WhatsApp वर कोणताही ईमेल किंवा मेसेज किंवा कोणतीही लिंक मिळाल्यास, लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. यामुळे फोन हॅक होण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या फोनमधील बँकिंग डिटेल्स लीक होऊ शकतात.
पैसे घेताना 'या' चुका करू नका.
QR कोडद्वारे फ्रॉड लोक जनतेची फसवणूक करतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. फ्रॉड लोक वापरकर्त्याला विश्वास देतात की, ते QR कोडद्वारे पैसे पाठवत आहेत. ऑनलाइन फसवणूक करणारे वापरकर्त्याला QR कोड स्कॅन करण्यास सांगतात. वापरकर्त्याने QR कोड स्कॅन करताच त्यांना UPI पिन टाकण्यास सांगितले जाते. अशा चुकांमुळे ग्राहकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.